ETV Bharat / business

अनिल अंबानींवर स्वत:चे कार्यालय भाड्याने देण्याची वेळ, 'या' कारणाने घेतला निर्णय - अनिल अंबानी

रिलायन्सचे मुख्यालय हे दीर्घकाळासाठी भाड्याने देण्यात येणार आहे. याचा हेतू केवळ कर्ज कमी करणे असल्याचे रिलायन्सने शेअर बाजाराला दिलेल्या माहिती म्हटले आहे.

अनिल अंबानी
author img

By

Published : Jul 1, 2019, 7:33 PM IST

नवी दिल्ली - देशातील आर्थिक राजधानीत अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे सांताक्रुझ येथे मुख्यालय आहे. अनिल अंबानी यांच्या कंपनीवर कोट्यवधी रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी कार्यालय भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रिलायन्सचे मुख्यालय हे दीर्घकाळासाठी भाड्याने देण्यात येणार आहे. याचा हेतू केवळ कर्ज कमी करणे असल्याचे रिलायन्सने शेअर बाजाराला दिलेल्या माहिती म्हटले आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची कार्यालयावरील मालकी असणार आहे. 2020 पर्यंत कर्जमुक्त कंपनी करण्याचा उद्देश्य असल्याचे रिलायन्सने म्हटले आहे.

असे आहे रिलायन्सचे मुख्यालय-
रिलायन्स सेंटर हे 6.95 लाख स्क्वेअर फुटांचे आहे. ते 15 हजार 514 स्क्वेअर मीटरच्या प्लॉटवर बांधण्यात आलेले आहे.

मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेलगत असलेल्या मध्यवर्ती ठिकाणावर हे रिलायन्सचे कार्यालय आहे. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. तर व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या बांद्रा-कुर्ला कॉम्पेलेक्सपासून 20 मिनिटांच्या अंतरावर रिलायन्सचे मुख्यालय आहे. तर सांताक्रुझ मेट्रो स्टेशनपासून काही पावलांच्या अंतरावर आहे.

रिलायन्स मुख्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या विविध मालमत्ता असलेल्या ठिकाणी काम करावे लागणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.