ETV Bharat / business

भारतीय रिझर्व्ह बँकेची लक्ष्मी विलास बँकेवर तत्पर सुधारात्मक आकृतिबंधाची कारवाई, 'ही' आहेत कारणे

भारतीय रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या पीसीएच्या कारवाईची माहिती लक्ष्मी विलास बँकेने शेअर बाजाराला दिली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेवर काही निर्बंध लादले आहेत. दर महिन्याला बँकेला प्रगतीचा आढावा भारतीय रिझर्व्ह बँकेला सादर करावा लागणार आहे.

संग्रहित - लक्ष्मी विलास बँक
author img

By

Published : Sep 28, 2019, 4:00 PM IST

Updated : Sep 30, 2019, 12:43 PM IST

चेन्नई - लक्ष्मी विलास बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने तत्पर सुधारात्मक आकृतिबंधाची (पीसीए) कारवाई केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने वाढलेल्या बुडित कर्जासह (एनपीए) इतर कारणांमुळे लक्ष्मी विलास बँकेला वित्तीय शिस्त लागण्यासाठी ही कारवाई केली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या तत्पर सुधारात्मक आकृतिबंधाच्या कारवाईची माहिती लक्ष्मी विलास बँकेने शेअर बाजाराला दिली आहे.
बँकेवरील कारवाईची ही आहेत कारणे

  • वाढलेले एनपीएचे प्रमाण
  • जोखीम घेण्यासाठी कमी झालेले भांडवलचे प्रमाण (सीएआर)
  • सलग दोन वर्षे मालमत्तेवर मिळणाऱ्या परताव्याचे घटलेले प्रमाण
  • मालमत्तेसाठी घेण्यात आलेल्या कर्जाचे वाढलेले प्रमाण

हेही वाचा-नेतृत्वाने उत्कृष्ट होण्याकरिता प्रेरित करावे; खचवू नये - टाटाचे वरिष्ठ अधिकारी

पीसीएची कारवाई करण्यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमाप्रमाणे ३१ मार्चला लक्ष्मी विलास बँकेचे परीक्षण केले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेवर काही निर्बंध लादले आहेत. दर महिन्याला बँकेला प्रगतीचा आढावा भारतीय रिझर्व्ह बँकेला सादर करावा लागणार आहे. ही कारवाई बँकेची कामगिरी सुधारणा करण्यासाठी करण्यात आली आहे. त्याचा रोजच्या व्यवहारावर तसेच मुदत ठेवी देव-घेवीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे लक्ष्मी विलास बँकेने म्हटले आहे.

हेही वाचा-केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची सरकारी कंपन्यांच्या प्रमुखांबरोबर बैठक सुरू

दरम्यान, लक्ष्मी विलास बँकेला रोख्यामधून १ हजार कोटी उभे करण्याला समभागधारकांनी २७ सप्टेंबरच्या सर्वसाधारण वार्षिक बैठकीत मंजुरी दिली आहे.

जाणून घ्या काय आहे तत्पर सुधारात्मक आकृतिबंध (पीसीए) ?
जेव्हा एखाद्या बँकेकडे जोखीम स्विकारण्यासाठी पुरेशी रक्कम नसते, तेव्हा अशा भारतीय रिझर्व्ह बँक तत्पर सुधारात्मक आकृतिबंधाचे नियम लागू करते. त्या बँकेची वित्तीय स्थिती सुधारण्यासाठी हे आकृतीबंध लागू करण्यात येतात. त्या आकृतीबंधातील नियमांचे बँकेला कठोर पालन करावे लागते.

काय आहे एनपीए (बुडित कर्ज) म्हणजे?

बँकांकडून देण्यात येणारे जे कर्ज हे बुडित म्हणजे परत मिळण्याची शक्यता कमी असते, असे कर्ज एनपीए म्हणून ओळखले जाते.

Intro:Body:

Dummy

Conclusion:
Last Updated : Sep 30, 2019, 12:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.