ETV Bharat / business

नवीन क्रेडिट कार्ड लाँच करण्यावर आरबीआयचे एचडीएफसी बँकेवर निर्बंध - RBI order to HDFC bank

एचडीएफसी बँकेने डिजीटल २.० आणि इतर आयटी अॅप्लिकेशन, नवीन क्रेडिट कार्ड लाँच करण्याची योजना आहे. मात्र, आरबीआयच्या निर्बंधामुळे हे नवीन लाँचिंग रखडणार आहे.

एचडीएफसी बँक
एचडीएफसी बँक
author img

By

Published : Dec 3, 2020, 4:52 PM IST

नवी दिल्ली - एचडीएफसी बँकेच्या आगामी डिजीटल व्यावसायिक उपक्रम आणि नवीन क्रेडिट कार्डच्या लाँचिंगवर भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्बंध लागू केले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून एचडीएफसीच्या डाटा सेंटरमधील कामावर परिणाम झाला होता. त्यामुळे आरबीआयने ही कारवाई केली आहे.

एचडीएफसी बँकेने डिजीटल २.० आणि इतर आयटी अॅप्लिकेशन, नवीन क्रेडिट कार्ड लाँच करण्याची योजना आहे. मात्र, आरबीआयच्या निर्बंधामुळे हे नवीन लाँचिंग रखडणार आहे. एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने अडचणींचे परीक्षण करून जबाबदारी निश्चित करावी, असे आरबीआय बँकेने म्हटले आहे.

हेही वाचा-फ्लिपकार्टपासून विलग होत फोनपे होणार स्वतंत्र कंपनी; 5,172 कोटींचे भांडवल तयार

काय म्हटले आहे एचडीएफसीने?

  • आरबीआय बँकेच्या नियमाप्रमाणे सर्व नियमांचे पालन करण्यात येणार असल्याचे एचडीएफसी बँकेने म्हटले आहे. तसेच त्याप्रमाणे सुधारणा करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
  • गेल्या दोन वर्षात आयटी यंत्रणा विकसित करण्यासाठी अनेक सुधारणा केल्या आहेत. त्यामध्ये आणखी सुधारणा करून नियामक संस्थेशी संपर्कात राहणार आहे.
  • डिजीटल बँकिंग चॅनेलमध्ये सुधारणा करण्यासाठी भक्कम पावले उचण्यात येणार आहेत.

सध्याच्या आरबीआयच्या कारवाईचा सध्याच्या डिजीटल बँकिंग चॅनेल आणि कामकाजावर परिणाम होणार नाही, अशी अपेक्षा एचडीएफसीने केली आहे. या सुधारणांचा बँकेच्या एकूण व्यवसायावर परिणाम होणार नसल्याचेही एचडीएफसीने म्हटले आहे.

हेही वाचा-'२०२० फोर्च्युन इंडिया ५००' यादीत रिलायन्स ठरली अव्वल; इंडियन ऑईलला टाकले मागे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.