ETV Bharat / business

वाहन उद्योगात मंदीचे सावट.. प्रवासी वाहनांच्या विक्रीत जुलैमध्ये ११ टक्क्यांची घट

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन्सच्या (एफएडीए) आकडेवारीनूसार जुलै २०१८ मध्ये २ लाख ७४ हजार ७७२ प्रवासी वाहनांची विक्री झाली. गतवर्षीच्या तुलनेत दुचाकींच्या विक्रीत जुलैमध्ये ५ टक्क्यांची घट झाली.

संग्रहित - प्रवासी वाहन
author img

By

Published : Aug 19, 2019, 6:22 PM IST

नवी दिल्ली - वाहन वितरकांची संघटना असलेल्या एफएडीएने प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट झाल्याचे म्हटले आहे. गतवर्षीच्या तुलनेत जुलैमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत ११ टक्क्यांनी घट झाल्याचे एफएडीएने म्हटले आहे.

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन्सच्या (एफएडीए) आकडेवारीनूसार जुलै २०१८ मध्ये २ लाख ७४ हजार ७७२ प्रवासी वाहनांची विक्री झाली. दुचाकींच्या विक्रीत जुलैमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ५ टक्क्यांची घट झाली.

जुलैमध्ये १३ लाख ३२ हजार ३८४ वाहनांची विक्री झाली आहे. तर गेल्यावर्षी जुलैमध्ये १४ लाख ३ हजार ३८२ वाहनांची विक्री झाली. व्यवसायिक वाहनांच्या विक्रीत जुलैमध्ये १४ टक्क्यांनी घट झाली आहे. चालू वर्षात जुलैमध्ये २३ हजार ११८ तर गतवर्षी २६ हजार ८१५ वाहनांची विक्री झाली आहे. तीन चाकीच्या विक्रीत ३ टक्के वाढ झाली आहे. चालू वर्षात जुलैमध्ये ५५ हजार ८५० तीन चाकींची विक्री झाली आहे. तर गेल्या वर्षी ५४ हजार २५० तीन चाकींची विक्री झाली होती.

जुलैमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांच्या वर्गवारीत ६ टक्के विक्री कमी झाल्याचे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन्सने म्हटले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.