ETV Bharat / business

अदार पुनावाला यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांसह परराष्ट्रमंत्र्यांचे मानले आभार, कारण...

author img

By

Published : Jun 5, 2021, 8:15 PM IST

व्हाईट हाऊस कोव्हिड १० रिस्पॉन्स टीम आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकाची लिंक अदार पुनावाला यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. याविषयी पूर्ण बातमी वाचा.

अदार पुनावाला जो बिडेन
अदार पुनावाला जो बिडेन

नवी दिल्ली - लस निर्मितीसाठी लागणाऱ्या आवश्यक कच्च्या मालाचा अमेरिकेकडून पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने सीरमचे सीईओ अदार पुनावाला यांनी धोरणात बदल केल्याने अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे आभार मानले आहेत. धोरणातील बदलामुळे भारतात आणि जगात कोरोना लशीचे उत्पादन वेगाने होईल, असा विश्वास पुनावाला यांनी व्यक्त केला आहे.

अमेरिकेत कोरोना लशीची पुरेशी उपलब्धता आहे. याची खात्री पटल्यानंतर बायडेन सरकारने एस्ट्राजेनका, नोव्हाव्हॅक्स आणि सनोफी या लशींच्या निर्यातीवरील निर्बंध हटविले आहेत. यापूर्वी संरक्षण उत्पादनाच्या कायद्यानुसार या कंपन्यांच्या निर्यातीवर अमेरिकन सरकारने निर्बंध लागू केले होते. निर्यातीवरील निर्बंध हटल्याने तिन्ही लस उत्पादक कंपन्यांना मागणीप्रमाणे विदेशात निर्यात करता येणार आहे.

हेही वाचा-'सुरक्षेच्या आडून पूनावालांची हेरगिरी केली जातेय'

अदार पूनावाला यांनी केले ट्विट

व्हाईट हाऊस कोव्हिड 10 रिस्पॉन्स टीम आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकाची लिंक अदार पुनावाला यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. त्यावर म्हटले आहे, पोट्स (अमेरिकेचे अध्यशक्ष), व्हाईट हाऊस आणि, डॉ. एस. जयशंकर यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांचे धन्यवाद. धोरणातील बदलामुळे कच्च्या मालाची भारताची व इतर देशांची गरज पूर्ण होईल, अशी आशा आहे. त्यामुळे लसनिर्मितीची क्षमता वाढेल. महामारीविरोधात आमची मोहिम अधिक बळकट होईल.

हेही वाचा-भारतात होणार 'स्पुटनिक व्ही' लसीचे लवकरच उत्पादन, सीरम संस्थेला मिळाली परवानगी

एप्रिलमध्ये अमेरिकेच्या अध्यक्षांनी केली होती विनंती

ट्विट करून केली विनंती

अदार पूनावालांनी एप्रिलमध्ये ट्विट करून त्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅग केले होते "आदरणीय राष्ट्रपती, जर आपण खरच कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत एकत्र आहोत, तर अमेरिकेबाहेरील लस उद्योगांच्या वतीने मी आपणास नम्रपणे विनंती करतो की, अमेरिकेबाहेर होणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदी उठवा. यामुळे लसीच्या निर्मितीला वेग मिळेल. तुमच्या प्रशासनाकडे याची सविस्तर माहिती आहे." असे ट्विटर अदार पूनावालांनी केले होते.

यापूर्वीही केले होते ट्विट

यापूर्वीही अदार पूनावाला यांनी कच्च्या मालाचा मुद्दा उपस्थित केला होता, कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी शक्य असते तर मीच अमेरिकेत जाऊन आंदोलन केलं असतं असेदेखील ते म्हणाले होते. त्यामुळे लसींच्या निर्मितीच्या दृष्टीने कच्च्या मालाचा पुरवठा तातडीने होण आवश्यक असून आता हा पुरवठा कधी होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. पूनावाला यांनी यासंदर्भात ट्विट करत अमेरिका आणि युरोपने कच्च्या मालाचा पुरवठा थांबवल्याचेही यापूर्वी सांगितले होते. यानंतरही आवश्यक कच्च्या मालाचा पुरवठा होत नसल्याने अखेर त्यांनी थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडेच विनंती केली आहे.

सीरम जूनमध्ये भारताला देणार 10 कोटी लशींचे डोस

सीरम 9 ते 10 कोटी डोस देणार सरकारला देणार आहे. देशात 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहीमेअंतर्गत आतापर्यंत 21 कोटी लस टोचवण्यात आल्या आहेत. जूनमध्ये कोविशिल्डचे 9 ते 10 कोटी डोसचे उत्पादन आणि पुरवण्यात येतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने म्हटले आहे. कर्मचारी लस उत्पादनासाठी दिवस रात्र प्रयत्न करत आहेत. भारत सरकारच्या सहकार्याने आम्ही पूर्ण क्षमता वापरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.