पुणे- पियाजिओ व्हेईकल्स प्रा. लि. (पीव्हीपीएल) या इटालियन पियाजिओ ग्रुपच्या उत्पादक कंपनीने बीएस- ६ श्रेणीतील मॉडेलचे लाँचिग केले आहे. डिझेल आणि पर्यायी इंधन श्रेणीतील 'दि परफॉर्मन्स रेंज' या नावाने ही बाजारात उपलब्ध करण्यात आली आहे.
पियाजिओच्या डिझेल श्रेणीमध्ये नवीन शक्तिशाली ५९९ सीसी इंजिन आहे. त्यातून ७ किलोवॅट शक्ती आणि २३.५ एनएम टॉर्क मिळतो. हे इंजिन ५-स्पीड गिअर बॉक्स आणि नवीन अॅल्युमिनियम क्लचसह आहे. ते भार वाहून नेण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवते. त्यातून वाहनाच्या फेऱ्या मारण्यासाठी कमी वेळ लागतो.
हेही वाचा-भारताचा मंदावलेला विकासदर तात्पुरता - आएमएफ प्रमुख
सुधारित मालवाहू वाहनात एक मोठे केबिन आहे. त्यातून अधिक चांगली हेडरूम तसेच चालकासाठी जास्त जागा देण्यात आली आहे. प्रवासी श्रेणीमध्ये प्रवाशांसाठी नवीन सुरक्षा दरवाजेही आहेत. पर्यायी इंधन श्रेणीमध्ये उद्योगातील सर्वाधिक सुधारित 'ड्राइव्ह ट्रेन' आहे. त्यात २३० सीसी ३ व्हॉल्व्ह हायटेक इंजिनही आहे. ग्राहकांना शहरात प्रवास करताना एक चांगली, कमी आवाजाची राईड, चांगल्या चालवण्याच्या क्षमतेसह मिळू शकेल, असा दावा पियाजिओ व्हेईकल्स कंपनीने केला आहे.
हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प २०२० : अधिक आणि योग्य असा खर्च करा!
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिलनंतर केवळ बीएस-६ इंजिनक्षमतेच्या वाहनांची विक्री करता येणार आहे. त्यामुळे सर्वच वाहन कंपन्या बीएस-६ इंजिनक्षमतेची वाहने बाजारात आणत आहेत.