नवी दिल्ली - वाहन उद्योग अजूनही मंदीतून सावरलेला नाही. प्रवासी वाहनांच्या विक्रीत नोव्हेंबरमध्ये ०.८४ टक्के अशी अंशत: घसरण झाली आहे. चालू वर्षात नोव्हेंबरमध्ये २ लाख ६३ हजार ७७३ प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये २ लाख ६६ हजार वाहनांची विक्री झाली होती.
गतवर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत यंदा नोव्हेंबरमध्ये मोटारसायकलींच्या विक्रीत १४.८७ टक्के घसरण झाली आहे. सर्व प्रकारच्या दुचाकींच्या विक्रीत नोव्हेंबरमध्ये १४.२७ टक्के घसरण झाली आहे. चालू वर्षात नोव्हेंबरमध्ये एकूण १४ लाख १० हजार ९३९ वाहनांची विक्री झाली आहे. तर गतवर्षी एकूण १६ लाख ४५ हजार ७८३ वाहनांची विक्री झाली होती. तर व्यापारी वाहनांची विक्रीही १४.९८ टक्क्यांनी घसरली आहे.
हेही वाचा-कांदा साठवणुकीचे नियम आणखी कडक; किरकोळ विक्रेत्यांकरता 'हा' नवा नियम लागू
सर्व प्रकारच्या वाहनांच्या विक्रीत १२.०५ टक्के घसरण झाली आहे. गेली ११ महिने वाहन उद्योग मंदीमधून जात आहे. सरकारने कॉर्पोरेट करांसह इतर आर्थिक सुधारणा लागू करून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा-हिरो मोटोकॉर्पच्या वाहनांच्या किमती जानेवारीत २ हजार रुपयापर्यंत वाढणार