नवी दिल्ली - कोरोना लशीचा देशात तुटवडा असताना दिलासादायक बातमी आहे. पॅनासिया बायोटेकने 'स्पूटनिक व्ही' लशीचे हिमाचल प्रदेशमधील बड्डीमध्ये उत्पादन सुरू केले आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (आरडीआयएफ) म्हटले, की आरडीआयएफ आणि पॅनासिया बायोटेकने रशियन 'स्पूटनिक व्ही' लशीचे हिमाचल प्रदेशचे उत्पादन सुरू केल्याचे जाहीर केले.
बड्डी येथील उत्पादन प्रकल्पामधून लशींची पहिली बॅच गॅमलिया केंद्रात गुणवत्ता नियंत्रणासाठी पाठविली जाणार आहे. संपूर्ण क्षमतेने उत्पादन उन्हाळ्यात सुरू होणार आहे. आरडीएफचे सीईओ किरिल दिमित्रिव म्हणाले, की स्पूटनिक व्हीच्या उत्पादनाने भारतीय यंत्रणा कोरोनाला लवकरात लवकर मागे टाकेल. ही लस पुढील टप्प्यात इतर देशांमध्येही निर्यात केली जाणार आहे.
स्पूटनिक ही कोरोनाला प्रतिबंध करणारी पहिली लस म्हणून नोंदणी झाली आहे. ही लस गॅमेलिया नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडिमायलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने विकसित केली आहे. तर आरडीआयएफ ही लशीची जगात मार्केटिंग करत आहे.
हेही वाचा-तीन दिवसात राज्यांना मिळणार ४८ लाख लशींचे डोस - केंद्र सरकार
स्पूटनिक व्ही लशीबाबत महत्त्वाचे मुद्दे
- डॉ. रेड्डीजने सप्टेंबर २०२० मध्ये रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडबरोबर भागीदारी केली आहे. या भागीदारीतून स्पूटनिक व्हीची चाचणी घेण्यात येणार आहे.
- स्पूटनकि व्ही ही लस विकसित करणाऱ्या गॅमेलेया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इपिडिमिलॉजी आणि मायक्रोबायॉलॉजीला भारतात 125 दशलक्ष लशीचे डोस देण्याची परवानगी मिळालेली आहे.
- यापूर्वीच आरडीआयएफचे सीईओ किरील दमित्रिएव यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत भारतामध्ये 50 दशलक्ष डोसचे उन्हाळ्यात उत्पादन केले जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी आरडीआयएफने भारतामधील पाच औषधी कंपन्यांबरोबर करार केले आहेत.
- स्पूटनिक व्ही भारतामध्ये उपलब्ध होणारी कोरोनावरील तिसरी लस असणार आहे. यापूर्वी भारताने भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरमची कोव्हिशिल्ड या लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.
- कोरोनापासून संरक्षण मिळविण्यासाठी फायझर, स्पूटनिक व्ही आणि मॉर्डना लसीचे प्रत्येकी दोन डोस घ्यावे लागतात. तर कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डचे दोन डोस घ्यावे लागतात.
हेही वाचा-नाशिक : लॉकडाऊनमध्ये 15 दिवसांनतर बाजार समित्या सुरू; कांद्याचे भाव स्थिर
स्पूटनिक व्हीचे जगभरात ३२० कोटी उत्पादन घेण्यात येणार
भारताने स्पूटनिक व्ही लशीच्या वापरासाठी आपत्कालीन स्थितीत एप्रिलमध्ये परवानगी दिली आहे. डॉ. रेड्डीज लॅबने गेल्या आठवड्यात स्पूटनिक लशींचे सॉफ्ट लाँचिंग केले आहे. करारानुसार पॅनासिया वर्षाखेर 10 कोटी स्पूटनिक लशींचे उत्पादन करणार आहे. स्पूटनिक व्हीची कोरोनाविरोधात 97.6 टक्के कार्यक्षमता आहे. या लशीची 66 देशांमध्ये नोंदणी केली आहे. स्पूटनिक व्हीचे 320 कोटी उत्पादन घेण्यात येणार आहे.
हेही वाचा-पंतजली डेअरीचे सीईओ सुनिल बन्सल यांचा कोरोनाने मृत्यू