नवी दिल्ली - हॉस्पिटॅलिटी उद्योगातील ओयो कंपनीने नोकरीवरून कपात केलेल्या आपल्याच कर्मचाऱ्यांसाठी अनोखी ऑफर जाहीर केली आहे. या कर्मचाऱ्यांना एकशे तीस कोटींचे शेअर देऊन कंपनीच्या मालकीत भागीदार करून घेतले जाणार आहे.
ओयो कंपनीचे संस्थापक आणि सीईओ रितेश अग्रवाल यांनी कर्मचारी कपात करणार असल्याची आठ एप्रिलला घोषणा केली होती. कंपनीचे जगभरातील हजारो कर्मचारी बेरोजगार होणार आहेत. मात्र कंपनीने ही आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही.
अनेक कर्मचाऱ्यांना कामावर परत घेऊ, असा विश्वास अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. कंपनीसाठी योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना शेअर देऊन त्यांची दखल घेतली जाणार असल्याचे त्यांनी आज जाहीर केले आहे.
विशेष म्हणजे यात कामावरून केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना शेअर दिले जाणार आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना गंभीर आजारात उपचार कर्मचाऱ्यांना व नवी नोकरी शोधण्यासाठी मदत केली जाणार आहे. अशाप्रकारे जपानमधील 150 कर्मचाऱ्यांना लाभ झाल्याचे रितेश अग्रवाल यांनी सांगितले आहे.
कोरोनाच्या संकटाने परिणाम झालेल्या कर्मचाऱ्यांची अग्रवाल यांनी माफीही मागितली आहे. यामध्ये तुमचा कोणताही दोष नाही. हा प्रत्येकासाठी दुर्मीळ आणि कठीण काळ असल्याचे कंपनीचे सीईओ अग्रवाल यांनी म्हटले आहे.