ETV Bharat / business

देशात सर्वात मोठा ई-स्कूटर उत्पादन प्रकल्प 'ही' कंपनी करणार सुरू

author img

By

Published : Nov 3, 2020, 6:43 PM IST

Updated : Nov 3, 2020, 7:26 PM IST

ओलाने विविध प्रकल्पांतून वार्षिक २० लाख ई-स्कूटरचे उत्पादन घेण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी १०० एकर जागेवर सौर उर्जा वापर करून प्रकल्प चालविण्यात येणार आहे.

ई-स्कूटर
ई-स्कूटर

नवी दिल्ली - ई-स्कूटरचे उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी ओलाकडून विविध राज्य सरकारांशी चर्चा सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश व कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे.

ओलाने विविध प्रकल्पांतून वार्षिक २० लाख ई-स्कूटरचे उत्पादन घेण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी १०० एकर जागेवर सौर उर्जा वापर करून प्रकल्प चालविण्यात येणार आहे. येत्या १८ ते २४ महिन्यांत उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचा ओला इलेक्ट्रिकचा प्रयत्न आहे. ओला इलेक्ट्रिकने १ हजार अभियंत्यांना नोकरी देणार असल्याचे जाहीर केले. तर लवकरच इलेक्ट्रिक दुचाकी लाँच करणार असल्याचेही कंपनीने म्हटले होते. ओला इलेक्ट्रिकमध्ये टायगर ग्लोबल, मॅट्रिक्स इंडिया, टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांनी गुंतवणूक केली आहे.

इलेक्ट्रिक वाहन उद्योगात तीव्र स्पर्धा होण्याची शक्यता-

दरम्यान, बजाज ऑटो, हिरो मोटो कॉर्पची मालकी असलेली एथरएनर्जी, हिरो इलेक्ट्रिक या कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू केले आहे. ओलानेही इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन घेतल्यास या क्षेत्रात तीव्र स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

Last Updated : Nov 3, 2020, 7:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.