ETV Bharat / business

अबुधाबीमधील कंपनी जिओमध्ये करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक - Reliance industries on jio

जिओच्या एकूण शेअरचे मूल्य हे 4.1 लाख कोटी रुपये असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजने म्हटले आहे.

Investment in jio
जिओमधील गुंतवणूक
author img

By

Published : Jun 5, 2020, 1:12 PM IST

मुंबई- टाळेबंदीच्या दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजला गुंतवणुकीत पुन्हा एकदा मोठे यश आले आहे. अबुधाबीमधील मुबादाला इन्व्हस्टमेंट कंपनीने जिओमध्ये 9 हजार 93 कोटी 60 लाख रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या गुंतवणुकीनंतर जिओचा 1. 85 टक्के हिस्सा मुबादाला कंपनीकडे येणार आहे. जिओच्या एकूण शेअरचे मूल्य हे 4.1 लाख कोटी रुपये असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजने म्हटले आहे.

जिओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मुबादाला कंपनीचे भांडवल हे 229 अब्ज डॉलर एवढे आहे. ही कंपनी अंतराळ, सेमीकंडक्टर, धातू, खाणकाम,खनिज तेल आणि नैसर्गिक वायू, पेट्रोकेमिकल्स, आरोग्य, स्थावर मालमत्ता, औषधी निर्माण, वैद्यकीय तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.

जिओने आजपर्यंत एकूण 87,655.35 कोटी रुपयांची गुंतवणूक विविध कंपन्यांकडून मिळविली आहे. यामध्ये फेसबूक, सिल्वर लेक, विस्टा पार्टनर्स, जनरल अटलांटिक केकेआर आणि मुबादला या जागतिक कंपन्यांकडून करण्यात आलेल्या गुंतवणुकीचा समावेश आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी मुबादला ग्रुपच्या गुंतवणुकीबाबत आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, अबूधाबीशी दीर्घकाळापासून संबंध आहेत. मी स्वतः मुबादाला ग्रुपचे विविध क्षेत्रातील संयुक्त अरब अमिरातीमधील काम पाहिले आहे.

मुबादाला ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक खलदून ए मुबारक म्हणाले, की जिओने भारतामधील संवाद आणि संपर्क यामध्ये केलेले परिवर्तन आम्ही पाहिले आहे. भारताच्या डिजिटल विकासाच्या प्रवासाला सहकार्य करण्यासाठी आम्ही बांधील आहोत.

जिओने देशातील 130 कोटी लोकांना डिजिटल सेवा देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यासाठी जिआओकडून छोटे व्यापारी, लघू उद्योग व शेतकरी यांना जोडण्याकरिता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.