ETV Bharat / business

महिला सक्षमीकरणाकरिता मायक्रोसॉफ्टचे पाऊल, तेलंगणा सरकारबरोबर केली भागीदारी

मायक्रोसॉफ्ट हे तेलंगणाबरोबरील भागीदारातून  शिकण्याच्या विविध प्रक्रिया तसेच साधनांची रचना करणार आहे. तसेच त्यांची  महिलांच्या विकासासाठी अंमलबजावणी करणार आहे.

author img

By

Published : Jul 20, 2019, 8:02 PM IST

मायक्रोसॉफ्टचा तेलंगणाबरोबर भागीदारी करार

हैदराबाद - मायक्रोसॉफ्टने तेलंगणा सरकारच्या महिला आंत्रेप्रेन्यूअर हबबरोबर (वूई हब) भागीदारी केली आहे. यामागे महिला आंत्रेप्रेन्यूअर आणि तंत्रज्ञांना सक्षमीकरण्याचा मायक्रोसॉफ्टचा उद्देश आहे.

मायक्रोसॉफ्ट हे तेलंगणाबरोबरील भागीदारातून शिकण्याच्या विविध प्रक्रिया तसेच साधनांची रचना करणार आहे. तसेच त्यांची महिलांच्या विकासासाठी अंमलबजावणी करणार आहे. यातून मुलींना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
वूई हब कम्युनिटीजच्या पायाभूत सुविधा या मायक्रोसॉफ्ट गॅरेजमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हा प्लॅटफॉर्म कर्मचाऱ्यांच्या नवसंशोधनासाठी तयार करण्यात आलेला आहे.

डिजीटल तंत्रज्ञानाने अनेक भारतीयांचे जीवन बदलत आहे. जागतिक तंत्रज्ञानामधील नेतृत्वाबरोबर महिलांना काम करण्याची संधी मिळणार असल्याचे वूई हबच्या सीईओ दीप्ती रावूला यांनी सांगितले. महिलांना क्लाउड, एआयसारखे तंत्रज्ञान मायक्रोसॉफ्ट उपलब्ध करून देणार आहे.

मायक्रोसॉफ्ट गॅरेजच्या संचालक रिना दयाल यादव म्हणाल्या, तंत्रज्ञानाचा विस्तार होत असताना आम्हाला विकसित कौशल्य असलेल्या बुद्धिमान व्यक्तींची गरज भासणार आहे. महिलांचे सक्षमीकरण करण्यातून कौशल्याची क्रांती भारताच्या मूळापासून करण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे. योग्य तंत्रज्ञानाचा पायाभूत सुविधा, संस्थांचे सहकार्य आणि प्रशिक्षण यातून महिलांना आम्ही घडविणार आहोत. त्यातून उद्याचा भारत घडेल, असा यादव यांनी विश्वासही व्यक्त केला.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.