ETV Bharat / business

विलिनीकरणानंतर 'ही' बँक पुढील वर्षी १ एप्रिलपासून होणार सुरू

युनायटेड बँक ऑफ इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक कुमार प्रधान यांनी नवी बँक १ एप्रिल २०२० पासून कार्यान्वित होणार असल्याचे सांगितले.

author img

By

Published : Sep 14, 2019, 8:41 PM IST

संपादित

कोलकाता - केंद्र सरकाच्या निर्णयानंतर युनायटेड बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि ओरिएन्टल बँके ऑफ कॉमर्सचे विलिनीकरण होणार आहे. ही बँक पुढील वर्षी १ एप्रिलापासून कार्यान्वित होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

युनायटेड बँक ऑफ इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक कुमार प्रधान यांनी नवी बँक १ एप्रिल २०२० पासून कार्यान्वित होणार असल्याचे सांगितले. तीन बँकांच्या विलिनीकरणानंतर नव्या बँकेचे नाव कदाचित वेगळे असणार आहे. ही १८ लाख कोटींची उलाढाल असलेली एसबीआयनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असणार आहे.

हेही वाचा-आरबीआयकडून ४ ऑक्टोबरच्या पतधोरण निर्णयात पुन्हा व्याजदर कपात होणार : तज्ज्ञांचा अंदाज

तिन्ही बँकांच्या ग्राहकांच्या संपर्क कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला पंजाब नॅशनल बँकेचे सरव्यवस्थापक चंदेर खुराणा, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्सचे सरव्यवस्थापक विनय कुमार गुप्ता उपस्थित होते. कर्मचाऱ्यांमध्ये कसलीही कपात करणार नसल्याचे अशोक कुमार प्रधान यांनी सांगितले. तसेच स्वेच्छा निवृत्ती कर्मचाऱ्यांना देण्याची शक्यता नसल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा-धक्कादायक! 32,000 कोटींच्या विविध प्रकरणात 18 सरकारी बँकांची फसवणूक

बँकांच्या विलिनीकरणानंतर एकूण कर्मचारी १ लाख असणार आहेत. तर बँक शाखांची संख्या ११ हजार ४०० असणार आहेत. केंद्र सरकार युनायटेड बँक ऑफ इंडियाला १६ हजार कोटींचे भांडवली अर्थसहाय्य करणार आहे. तर पंजाब नॅशनल बँकेला १ हजार ६०० कोटी रुपयांचे भांडवली अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.

हेही वाचा-केंद्रासह राज्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी टाळावी; आरबीआय अंतर्गत कार्यसमुहाची शिफारस

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.