ETV Bharat / business

मास्टरकार्ड भारतातील छोट्या उद्योगांना करणार अडीच कोटींची मदत

author img

By

Published : Jul 29, 2020, 9:40 AM IST

सद्य परिस्थितीत डिजिटल पेमेंट्स आणि डिजिटल तंत्रज्ञानास चालना देण्यासाठी मास्टरकार्ड छोट्या व्यापाऱ्यांना 250 कोटी रुपयांचे कर्ज दणार आहे.

मास्टरकार्ड
मास्टरकार्ड

नवी दिल्ली - सद्य परिस्थितीत डिजिटल पेमेंट्स आणि डिजिटल तंत्रज्ञानास चालना देण्यासाठी मास्टरकार्ड छोट्या व्यापाऱ्यांना 250 कोटी रुपयांचे कर्ज दणार आहे. अखिल भारतीय व्यापारी महासंघाच्या सहकार्याने मास्टरकार्डने ही घोषणा केली आहे. छोट्या व्यापाऱ्यांना कोरोनाच्या साथीमुळे होणाऱ्या नुकसानीतून बाहेर येण्यासाठी 250 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे.

गेल्या वर्षापासून कॅटद्वारे राष्ट्रीय कॅशलेस मोहीम सुरू करण्यात आली असून त्याअंतर्गत 1 कोटीहून अधिक व्यापाऱयांनी डिजिटल पेमेंट स्वीकारले आहे. कॅट आणि मास्टरकार्ड यांच्या प्रयत्नांसह, ही मोहीम देशभरातील 35 टक्के लहान व्यापाऱ्यांशी जोडली गेली आहे. 250 कोटी रुपयांच्या कर्जाच्या घोषणेअंतर्गत कॅटच्या भागीदारीसह किराणा दुकान, वस्त्रोद्योग, मेडिकल इत्यादी छोट्या व्यापाऱयांना जोडण्याचा प्रयत्न केला जाईल.

मास्टरकार्ड आपल्या ज्ञान, तंत्रज्ञान आणि नेटवर्कचा फायदा भारतीय व्यावसायिकांना देईल. जेणेकरून, त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी मदत होईल, असे मास्टरकार्डचे दक्षिण आशिया विभागाचे अध्यक्ष पौरुष सिंह म्हणाले. दरम्यान, लॉकडाऊनमुळे देशभरातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, अशा परिस्थितीत व्यवसायाला पुन्हा रुळावर आणण्यास या कर्जामुळे मदत होईल.

मास्टरकार्ड हे आंतरराष्ट्रीय कार्ड असल्यामुळे यांच्या साहाय्याने जगभरात कुठेही पेमेंट करणं सोयीचं जातं. ही एक अमेरिकन कंपनी आहे. 200 पेक्षा जास्त देशांमध्ये मास्टरकार्ड स्वीकारले जातात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.