ETV Bharat / business

'मारुती'ची बीएस-६ इंजिन क्षमतेची इग्नीस लाँच

नवीन इग्नीस कारला १.२ लिटरचे पेट्रोल इंजिन आहे. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटो गिअर शिफ्टचा पर्याय आहे.

Ignis
इग्नीस
author img

By

Published : Feb 18, 2020, 2:51 PM IST

नवी दिल्ली - मारुती सुझुकीने बीएस-६ इंजिन क्षमतेची इग्नीस कार लाँच केली आहे. या कारची ४.८९ लाख ते ७.१९ लाख किंमत (एक्स-शोरुम दिल्ली) आहे.

नवीन इग्नीसला १.२ लिटरचे पेट्रोल इंजिन आहे. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटो गिअर शिफ्टचा पर्याय आहे. एसयूव्हीसारखी अधिक वैशिष्ट्य़े असलेल्या कारची मागणी वाढत असल्याचे आम्हाला दिसून येत आहे. नवीन इग्नीसची संरचना आणि मोकळी जागा असलेले इंटिरिअर हे ग्राहकाला आवडेल, असा विश्वास एमएसआयचे व्यवस्थापकीय संचालक केनेची आयुकावा यांनी व्यक्त केला.

हेही वाचा-हिरो मॉटोकॉर्प संशोधनात करणार १० हजार कोटींची गुंतवणूक

हे मॉडेल चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. मॅन्युल ट्रान्समिशनच्या कारची किंमत ही ४.८९ ते ६.७३ लाख रुपये किंमत आहे. तर ऑटो गिअर असलेली कारची किंमत ही ६.१३ ते ७.१९ लाख रुपये किंमत (सर्व किंमती दिल्ली एक्स शोरुम) आहे.

हेही वाचा-'कोरोना'चा आयातीवर परिणाम; सीआयआयची मोदी सरकारकडे अनुदानाची मागणी

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल २०२० नंतर केवळ बीएस-६ इंजिन क्षमता असलेल्या वाहनांची विक्री करता येणार आहे. त्यामुळे सर्वच वाहन कंपन्या बीएस-६ इंजिन क्षमतेच्या वाहनांचे लाँचिंग करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.