नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठ्या कार उत्पादक मारुती सुझूकी इंडियाने बीएस-६ इंजिनाचे निकष पूर्तता करणाऱ्या इको व्हॅनचे लाँचिंग केले. या बहुउपयोगी व्हॅनची किंमत ३.८ लाख रुपये आणि ६.८४ लाख रुपये (एक्स शोरुम दिल्ली/एनसीआर) किंमत आहे.
एमएसआयचे कार्यकारी संचालक (विपणन आणि विक्री) शंशाक श्रीवास्तव म्हणाले, स्वच्छ पर्यावरणासाठी आमची बांधिलकी आहे. त्याला पूरक असणाऱ्या बीएस-६ इंजिन क्षमतेच्या इकोचे लाँचिग केले आहे.
हेही वाचा-पियूष गोयल यांचा अॅमेझॉनच्या गुंतवणुकीवरून 'यू टर्न,' म्हणाले...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल २०२० पासून केवळ बीएस-६ इंजिनाचे निकष पूर्ण करणाऱ्या वाहनांची विक्री करता येणार आहे. या इंजिनक्षमतेचे मारुतीने इको हे नववे मॉडेल लाँच केले आहे.
हेही वाचा-देशातील 'या' प्रमुख उद्योजकांची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी घेतली भेट
गतवर्षी इकोची घाऊक बाजारपेठेत पहिल्यांदाच १ लाखांहून अधिक वाहनांची विक्री झाली होती. ही विक्री म्हणजे मारुतीच्या २०१८ च्या घाऊक विक्रीतील ३६ टक्के एवढा हिस्सा आहे. इको या मॉडेलचे जानेवारी २०१० मध्ये लाँचिग करण्यात आले आहे. यापूर्वीच इकोने एकूण ६.५ लाखाच्या विक्रीचा टप्पा ओलांडला आहे.