नवी दिल्ली - डीएस कुलकर्णी डेव्हलपरची मालमत्ता खरेदी करण्याकरिता मंत्रा प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स आणि सॉलिटेअर ग्रुपने निविदा दाखल केली आहे. अनेक ठेवीदार आणि घर खरेदी करणाऱ्यांना डीएस कुलकर्णी डेव्हलपरमधून पैसे परत मिळण्याची प्रतिक्षा आहे.
मुंबईमधील राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाच्या (एनसीएलटी) पीठाने सप्टेंबर २०१९ मध्ये डीएस कुलकर्णी डेव्हलपरची कॉर्पोरेट नादारी प्रक्रिया करण्याचे आदेश दिले होते. ही प्रक्रिया बँक ऑफ महाराष्ट्राच्या अर्जानुसार दिवाळी आणि नादारी प्रक्रिया २०१५ नुसार करण्याचे आदेश दिले होते.
हेही वाचा-शेअर बाजारात 271 अंशांची घसरण; गुंतवणूकदारांचे अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या निर्णयाकडे लक्ष
मनोज कुमार अग्रवाल हे रिझोल्यूशन प्रोफेशनल हे नादारी प्रक्रिया पार पाडत आहेत. सुत्राच्या माहितीनुसार मंत्रा प्रॉपर्टीज आणि सॉलिटेअर ग्रुपने डीएस कुलकर्णी कंपनी ताब्यात घेण्यासाठी निविदा दाखल केल्याची माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे.
हेही वाचा-सोन्याच्या दरात घसरण; चांदी प्रति किलो 340 रुपयांनी महाग
१,७५० कोटींचे कर्ज कंपनीला फेडावे लागणार
कंपनीवर कर्ज वसुलीचे एकूण १,७५० कोटींचे दावे आहेत. त्यापैकी १०५० कोटी रुपयांचे दावे हे १२ बँकांचे आणि इतर वित्तीय संस्थांचे आहेत. वित्तीय कर्जदार संस्थांना कर्जदाराच्या समितीमध्ये मताचे ६६.७ टक्के अधिकार आहेत. तर गृहखरेदी करणारे आणि ठेवीदारांना मतांचे १७ टक्के अधिकार आहेत.
हेही वाचा-सराफांना हॉलमार्किंग सक्तीच्या करण्यात सरकार एक पाऊल मागे; 'अशी' होणार अंमलबजावणी
कर्जदारांची समिती घेणार निर्णय-
सुत्राच्या माहितीनुसार मंत्रा प्रॉपर्टीजने गृहखरेदी करणाऱ्यांचे ७०० हून अधिक फ्लॅटचे काम पूर्ण करण्याची तयारी दर्शविली आहे. तर वित्तीय संस्थांना स्पेशल पर्पोज व्हिकलमधून ८०० कोटी रुपये हस्तांतरित करण्याची तयारी दर्शविली आहे. तिन्ही कंपन्यांच्या प्रस्तांवाचे कर्जदार समितीकडून मुल्यांकन करण्यात येत असल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे. याबाबतची चर्चा कर्जदारांच्या समितीच्या पुढील बैठकीत होणार आहे. यापूर्वी कर्जदारांच्या समितीची बैठक ५ जूनला पार पडली होती.
१२०० कोटीच्या घोटाळ्याचा आरोप-
गुंतवणूक केलेल्या पैशावर अधिक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन डीएसके यांनी तब्बल बाराशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या संदर्भात पोलिसांनी तपास पूर्ण केल्यानंतर आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. तसेच डीएसके यांना अटक केल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे. याबरोबरच डीएसके यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे.