ETV Bharat / business

भारताला निर्यातस्नेही केंद्र बनवा - मनू जैन

स्थानिक उत्पादनांना सवलती देण्यासाठी भारताने व्हिएतनामपासून खूप काही शिकायला हवे. सरकारने निर्यात उत्पादनांवर सवलती (आरओडीटीईपी) जाहीर केल्या आहेत. मात्र, हे जागतिक व्यापार नियमांचे पालन करत नसल्याचे मनू जैन यांनी सांगितले.

Export
निर्यात
author img

By

Published : Dec 23, 2019, 3:01 PM IST

नवी दिल्ली- देशाला जागतिक उत्पादनाचे 'हब' करण्यासाठी भारताने व्हिएतनाम आणि चीनबरोबर स्पर्धा करायला हवी, असे मत शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनू जैन म्हणाले. ते दोन्ही देश आकर्षक आणि स्थिर गुंतवणुकीच्या धोरणांचा अवलंब करत असल्याचे जैन म्हणाले.

मनू जैन यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भारतामधून बांगलादेश आणि नेपाळमध्ये स्मार्टफोन निर्यात करण्यात येतात. भारताने अधिक निर्यातस्नेही करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये निर्यातदाराला शुल्काचा परतावा मिळवून देण्यासारख्या उपक्रमाचा समावेश होवू शकतो, असे जैन यांनी सांगितले.

जागतिक दर्जाच्या चाचण्यांसाठी प्रयोगशाळांमध्ये गुंतवणुकीची गरज आहे. भारतीय मानांकन संस्थेमधील (बीआयएस) चाचण्यांना जगभरात स्वीकारले जात नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. पुढे ते म्हणाले, स्थानिक उत्पादनांना सवलती देण्यासाठी भारताने व्हिएतनामपासून खूप काही शिकायला हवे. सरकारने निर्यात उत्पादनांवर सवलती (आरओडीटीईपी) जाहीर केल्या आहेत. मात्र, हे जागतिक व्यापार नियमांचे पालन करत नाही.

आरओडीटीईपीबाबतची संदिग्धता दूर करायला हवी. सरकारकडून सवलती जाहीर करण्यात आल्या तर मोठ्या प्रमाणात शाओमी मोठ्या प्रमाणात निर्यात करेल, असेही जैन यांनी सांगितले.

हेही वाचा-....तर पेट्रोलसह डिझेलच्या किमती भडकणार

एका तासात तीन स्मार्टफोन तयार करण्याची देशातील उत्पादन प्रकल्पाची क्षमता आहे. सध्या, ही क्षमता पूर्णपणे वापरण्यात येते. उत्पादनांची मागणी लक्षात घेता ही क्षमता वाढविण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली.

हेही वाचा-'जागतिक बलाढ्य किरकोळ विक्रेत्यांमुळे देशातील सहा कोटी दुकानदारांना धोका'

शाओमीचे जगात ७ उत्पादन प्रकल्प आहेत. यामधील चार प्रकल्प भारतात आहेत. आंध्रप्रदेशमध्ये एक तर तामिळनाडूमध्ये दोन तर नोएडामध्ये १ उत्पादन प्रकल आहे. या प्रकल्पामधील उत्पादन करण्यात आलेले ९९ टक्के स्मार्टफोन देशातील बाजारपेठेत विकले जातात.

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.