ETV Bharat / business

ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदीचे सावट; महिंद्रासह मारुतीच्या वाहन विक्रीत ऑगस्टमध्ये घसरण

एम अँड एमचे मुख्य विक्री आणि विपणन अधिकारी विजय राम नक्रा म्हणाले, अनेक कारणांमुळे वाहनांची ऑगस्टमध्ये विक्री घटली आहे. सण जवळ येत असताना आम्ही आशावादी आणि सकारात्मक आहोत, असेही त्यांनी सांगितले.

संग्रहित - वाहन उद्योग
author img

By

Published : Sep 1, 2019, 5:17 PM IST

मुंबई - वाहन उद्योगामधील मंदीची पडछाया अजूनही गडदच आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपन्यांच्या वाहन विक्रीत २६ टक्के ऑगस्टमध्ये घसरण झाली आहे. मारुती सुझुकी इंडियाच्या वाहनांच्या विक्रीत ऑगस्टमध्ये ३२.७ टक्के घट झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून वाहन निर्मिती करणाऱ्या सर्व प्रमुख कंपन्यांना मंदीला सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा-वाहन उद्योगात मंदी; सरकारने हस्तक्षेप करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

वाहन उद्योगातील मंदीची ही आहेत कारणे

  • वित्तपुरवठ्याची कमतरता
  • जीएसटीचे अधिक प्रमाण
  • बीएस-४ वरून बीएस-५ वाहनांचे इंजिन करण्याचा नियम

ऑगस्टमध्ये महिंद्रा अँड महिंद्राच्या ३३ हजार ५६४ वाहनांची विक्री झाली. गतवर्षी ऑगस्टमध्ये ४५ हजार ३७३ वाहनांची विक्री झाली होती. देशात एकूण ३६ हजार ८५ वाहनांची विक्री आणि निर्यात झाली आहे. गतवर्षी एकूण वाहन ४८ हजार ३२४ वाहनांची ऑगस्टमध्ये विक्री झाली होती. एम अँड एमचे मुख्य विक्री आणि विपणन अधिकारी विजय राम नक्रा म्हणाले, अनेक कारणांमुळे वाहनांची ऑगस्टमध्ये विक्री घटली आहे. सण जवळ येत असताना आम्ही आशावादी आणि सकारात्मक आहोत, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा- मंदीचे सावट.. टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये १० टक्क्यांची घसरण, गेल्या ५२ आठवड्यातील निचांक

मारुती सुझुकीच्या वाहन विक्रीतही घट-

मारुती सुझुकी इंडियाच्या वाहनांच्या विक्रीत ऑगस्टमध्ये ३२.७ टक्के घट झाली आहे. कंपनीची ऑगस्टमध्ये १ लाख ६ हजार ४१३ एकूण वाहनांची विक्री झाली. यामध्ये देशातील वाहनांची विक्री व निर्यात करण्यात आलेल्या वाहनांचा समावेश आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये एकूण १ लाख ५८ हजार १८९ वाहनांची विक्री झाली होती.

हेही वाचा-'वाहन उद्योगाला वेळीच पाठबळ दिले नाही तर १० लाख लोकांचे जातील रोजगार..'

मारुती सुझुकीच्या देशातील वाहनांच्या विक्रीत ३६ टक्के घट झाली आहे. तर ऑगस्टमध्ये वाहनांच्या निर्यातीत १०.८ टक्के घट झाली आहे. जिप्सी, इरटिगा, विस्तारा ब्रेझा अशा युटिलिटी वाहनांच्या विक्रीत वाढ झाल्याने काही प्रमाणात मारुती कंपनीला दिलासा मिळाला आहे.

Intro:Body:

dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.