ETV Bharat / business

महिंद्रा अँड महिंद्राकडून सर्व वाहनांवरील वॉरंटीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ - महिंद्रा अँड महिंद्रा वॉरंटी

ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी ही १ एप्रिल ते ३१ मेपर्यंत संपत आहे, अशा वाहनांसाठी वॉरंटी व मोफेत सेवेचा कालावधी वाढविण्यात आला आहे. महिंद्रा अँड महिंद्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष सतिंदर सिंग बाजवा म्हणाले, की महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे ग्राहकांना त्यांची वाहने नियोजित वेळेत दुरुस्ती व सेवेसाठी पाठविणे झाले शक्य नाही. असे असले तरी अशा कठीण काळात आम्ही ग्राहकांच्या पाठिशी आहोत.

महिंद्रा अँड महिंद्रा
महिंद्रा अँड महिंद्रा
author img

By

Published : May 22, 2021, 8:06 PM IST

मुंबई - महिंद्रा अँड महिंद्राने सर्व श्रेणीतील वाहनांची वॉरंटी आणि मोफत सेवेचा कालावधी हा ३१ जुलैपर्यंत वाढविला आहे. कोरोनामुळे अनेक राज्यांत टाळेबंदी असल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्राने हा निर्णय घेतला आहे.

ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी ही १ एप्रिल ते ३१ मेपर्यंत संपत आहे, अशा वाहनांसाठी वॉरंटी व मोफेत सेवेचा कालावधी वाढविण्यात आला आहे. कोरोनाची देशात असलेली दुसरी लाट आणि संपूर्ण देशात असलेले लॉकडाऊन या कारणांमुळे वॉरंटी आणि सेवा कालावधी ३१ जुलैपर्यंत वाढविल्याचे महिंद्रा कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा-ट्विटरने सुरू केले 'या' सहा क्षेत्रांतील व्यक्तींकरिता ब्ल्यू स्टिक व्हेरिफेकिशन

महिंद्रा अँड महिंद्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष सतिंदर सिंग बाजवा म्हणाले, की महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे ग्राहकांना त्यांची वाहने नियोजित वेळेत दुरुस्ती व सेवेसाठी पाठविणे झाले शक्य नाही. असे असले तरी अशा कठीण काळात आम्ही ग्राहकांच्या पाठिशी आहोत. सर्व पात्र वाहनांना ३१ जुलैपर्यंत वॉरंटी असल्याची आम्ही खात्री देत आहोत. ग्राहकांना कोणत्याही अडथळ्याविना मालकीचा अनुभव मिळावा, अशी आमची इच्छा आहे. ग्राहकांना डिजीटल आणि संपर्कविरहित सेवेसह विक्रीची मदत दिली जाणार असल्याचे बाजवा यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-दोन तासांत डिलिव्हरी देणारे अॅमेझॉन प्राईम नाऊ होणार बंद; 'हा' मिळणार पर्याय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.