नवी दिल्ली - भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) युनियन बँक ऑफ इंडियामधील हिस्सा 5 टक्क्यांहून अधिक झाला आहे. एलआयसीने युनियन बँकेत 2 टक्क्यांहून अधिक हिस्सा घेतला आहे.
एलआयसीने यापूर्वी युनियन बँक ऑफ इंडियात 3.09 टक्के हिस्सा घेतला होता. त्यासाठी एलआयसीने बँकेचे 19,79,23,251 शेअर खरेदी केले आहेत. एलआयसीचा युनियन बँक ऑफ इंडियातील हिस्सा वाढून 5.06 टक्के आहे. एलआयसीकडे युनियन बँकेचे 34,57,64,764 शेअर आहेत. एलआयसीने प्रिफिशियन्स अलॉटमेंट शेअरमधून युनियन बँक ऑफ इंडियाचे 20 मे 2021 रोजी 14,78,41,513 शेअर खरेदी केले आहेत.
हेही वाचा-हिरो मोटोकॉर्प २४ मेपासून सर्व उत्पादन प्रकल्प पुन्हा करणार सुरू
युनियन बँकेने १,४४७.१७ कोटी रुपयांचा जमविला निधी-
युनियन बँक ऑफ इंडियाने गुरुवारी क्वालिफाईड इन्स्टि्टूशन्स प्लेसमेंट (क्यूआपी) बंद केले आहे. या योजनेमधून बँकेने1447.17 कोटी रुपयांचा निधी जमविला आहे. युनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअरची किंमत शुक्रवारी 1.63 टक्क्यांनी वाढून प्रति शेअर 37.45 रुपये होते.
हेही वाचा-मायक्रोसॉफ्टचे इंटरनेट एक्सप्लोअरर 'या' दिवशी घेणार निरोप