नवी दिल्ली - ज्या ग्राहकांची विमा योजना (पॉलिसी) दोन वर्षाहून अधिक काळ बंद आहे, अशा नागरिकांना एलआयसीने खूशखबर दिली आहे. अशा ग्राहकांना पुन्हा विमा योजना सुरू करता येणार आहेत. या निर्णयाने बंद पडलेल्या पॉलिसीचे प्रमाण कमी होईल, अशी एलआयसीची अपेक्षा आहे.
सध्याच्या नियमानुसार दोन वर्षांहून अधिक काळ बंद पडलेली पॉलिसी सुरू करता येत नाही. यामध्ये १ जानेवारी २०१४ नंतर घेतलेल्या पॉलिसीचा समावेश आहे. ग्राहकांना अधिक फायदा मिळून देण्यासाठी एलआयसीने विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) नियमात बदल करण्याची विनंती केली. त्यानंतर आयआरडीएआयने दोन वर्षे जुन्या बंद पडलेल्या पॉलिसी सुरू करण्याची एलआयसीला परवानगी दिली आहे.
हेही वाचा-इंडिगोच्या सर्व्हरमध्ये बिघाड; विमानतळांवर त्रस्त प्रवाशांच्या लागल्या रांगा
एलआयसीचे संचालक विपीन आनंद म्हणाले, दुर्दैवाने अशी परिस्थिती असते की एखाद्याला नियमितपणे विम्याचा हप्ता देणे शक्य होत नाही. त्यामुळे पॉलिसी बंद पडते. नवी विमा योजना घेण्यापेक्षा जुनी विमा योजना पुन्हा सुरू करणे, अधिक योग्य ठरते. विमा योजना घेणे, हा व्यक्तीच्या जीवनातील मोठा निर्णय असतो. आम्ही सर्व पॉलिसी होल्डर्स यांच्या विमा संरक्षण देण्याच्या इच्छेला किंमत देतो.
हेही वाचा-दुष्काळासह मंदीच्या फेऱ्यातील वाहन उद्योगाला सणांमधून मिळाली 'संजीवनी'
-
LIC brings an excellent opportunity for all its policyholders to revive their lapsed policies. The policies which have lapsed for more than two years and were not allowed to be revived earlier can also be revived now. pic.twitter.com/ky3abrVgBM
— LIC India Forever (@LICIndiaForever) November 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">LIC brings an excellent opportunity for all its policyholders to revive their lapsed policies. The policies which have lapsed for more than two years and were not allowed to be revived earlier can also be revived now. pic.twitter.com/ky3abrVgBM
— LIC India Forever (@LICIndiaForever) November 4, 2019LIC brings an excellent opportunity for all its policyholders to revive their lapsed policies. The policies which have lapsed for more than two years and were not allowed to be revived earlier can also be revived now. pic.twitter.com/ky3abrVgBM
— LIC India Forever (@LICIndiaForever) November 4, 2019
बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची एलआयसीच्या ग्राहकांना अनोखी संधी मिळाली आहे.