ETV Bharat / business

संकटातील येस बँकेला एलआयसीचा आधार; खरेदी केला 5 टक्के हिस्सा - Yes Bank latest news

येस बँकेचे शेअर खरेदी करून एलआयसीने बँकेतील हिस्सा हा 0.75 टक्क्यांवरून 4.98 टक्के केला आहे. ही माहिती येस बँकेने शेअर बाजाराला दिली आहे.

संग्रहित - येस बँक
संग्रहित - येस बँक
author img

By

Published : Aug 7, 2020, 2:40 PM IST

नवी दिल्ली – घोटाळ्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेला भारतीय जीवन आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) मोठा आधार दिला आहे. एलआयसीने येस बँकेचे 5 टक्के शेअर खुल्या बाजारामधून खरेदी केले आहेत.

येस बँकेचे शेअर खरेदी करून एलआयसीने बँकेतील हिस्सा हा 0.75 टक्क्यांवरून 4.98 टक्के केला आहे. ही माहिती येस बँकेने शेअर बाजाराला दिली आहे. एलआयसीने येस बँकेचा 4.23 टक्के हिस्सा घेण्यासाठी 105.98 कोटींचे शेअर खरेदी केले आहेत. यापूर्वी एलआयसीकडे येस बँकेचे 19 कोटी शेअर असल्याने बँकेत एकूण 0.75 टक्के हिस्सा होता.

येस बँकेच्या पतमानांकनात सुधारणा-

एलआयसीने येस बँकेच्या शेअरची खरेदी 21 सप्टेंबर 2017 आणि 31 जुलै 2020 मध्ये खरेदी केली होती. मूडीज या पतमानांकन सेवा देणाऱ्या कंपनीने येस बँकेला 'सीएए1' वरून 'बी3' हे सुधारित मानांकन दिले आहे. कारण बँकेने 15 हजार कोटींचे भांडवल उभा केले आहे. असे असले तरी मूडीजने येस बँकेला अजूनही बिगर गुंतवणुकीच्या श्रेणीतच ठेवले आहे.

येस बँकेत 4 हजार 300 कोटींचा घोटाळा-

ईडीने येस बँकेतील घोटाळ्यात आरोपी असलेले डीएचएफएलचे प्रवर्तक कपील आणि धीरज वाधवान यांची मालमत्ताही जप्त केली आहे. ईडीने मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात ही कारवाई केली आहे. राणा कपूरची विदेशातील मालमत्ताही केंद्रीय संस्थेने गोठविली आहे.

ईडीने येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर, त्याचे कुटुंबीय आणि इतरांवर 4 हजार 300 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. कोट्यवधी रुपयांच्या मोबदल्यात आरोपींनी बेकायदेशीरपणे येस बँकेतून कर्जांचे वाटप केले. त्यानंतर हे कर्ज बुडाल्याचे ईडीला तपासातून आढळले आहे. कपूरला ईडीने मार्चमध्ये अटक केली आहे. तेव्हापासून आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.