मुंबई - स्टेट बँकेपाठोपाठ कोटक महिंद्रा बँकेनेही गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. कोटक महिंद्रा बँकेने व्याजदरात ०.१० टक्क्यांची कपात केली आहे.
कोटक महिंद्रा बँकेने बाजारात गृहकर्जावरील व्याजदर सर्वात कमी असल्याचे म्हटले आहे. कोटक महिंद्राकडून ग्राहकांना गृहकर्ज हे ३१ मार्चपर्यंत ६.६५ टक्के या विशेष सवलतीत व्याजदराने मिळणार आहे. आर्थिक वर्षाखेर ग्राहकांना सवलतीच्या दरात गृहकर्ज देताना आनंद वाटत असल्याचे कोटक महिंद्रा बँकेचे ग्राहक मालमत्ता प्रमुख अंबुज चंदन यांनी म्ह
हेही वाचा-घराचे स्वप्न साकारणे सुलभ; स्टेट बँकेकडून व्याजदरात कपातटले आहे.
गृहकर्जावरील व्याजदर हे कर्जदाराच्या क्रेडीट स्कोअर आणि लोन टू व्हॅल्यूच्या (एलटीव्ही) प्रमाणात असल्याचे बँकेने म्हटले आहे. ग्राहकांना कोटक बँकेच्या नवीन गृहकर्जावर ६.६५ टक्के व्याजदर लागू होणार आहे. दरम्यान, कोरोनामुळे कर्जाच्या मागणीत घसरण झाली आहे. त्यामुळे गृहकर्जावरील व्याजदर हे १५ वर्षात सर्वाधिक कमी राहिले आहे.
हेही वाचा-गृहकर्जाने घराचे स्वप्न पूर्ण करू पाहणाऱ्यांना आरबीआयने दिला 'हा' दिलासा
अशी मिळणार स्टेट बँकेच्या ग्राहकांना गृहकर्जावर सवलत
- देशात ग्राहकांना सर्वाधिक कर्ज देणाऱ्या स्टेट बँकेने गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्कात ३१ मार्चपासून १०० टक्के सवलत दिली आहे. ग्राहकांना सीबीलच्या गुणांप्रमाणे गृहकर्जावरील व्याजात सवलत मिळणार आहे.
- ज्यांच्याकडून कर्जाची वेळेवर परतफेड होते, त्यांना कर्जाच्या व्याजदरात सवलत देणे महत्त्वाचे असल्याचे स्टेट बँकेने म्हटले आहे.
- नव्या व्याजदराप्रमाणे स्टेट बँकेचे गृहकर्ज ७५ लाखांपर्यंत असल्यास ६.७ टक्के व्याज तर ७५ लाखांहून अधिक गृहकर्ज असल्यास ६.७५ टक्के व्याज दर असणार आहे.
आरबीआयच्या निर्णयाने ग्राहकांना मिळत आहे फायदा
आरबीआयकडून ऑक्टोबर २०२० मध्ये गृहकर्जाला 'रिस्क व्हेटेज'या विभागातून म्हणजे जोखीम श्रेणीतून वगळण्यात आले आहे. तर वैयक्तिक गृहकर्जाला 'लोन टू व्हॅल्यू (LVT) रेशो'ला जोडण्यात आले आहे. त्यामुळे घराच्या एकूण किंमतीच्या काही अधिक टक्के गृहकर्ज ग्राहकांना मिळणार आहे. त्यामुळे घरासाठी ग्राहकांना गृहकर्जाच्या माध्यमातून अधिक रक्कम उभी करणे सोपे होणार आहे. या निर्णयाचा नवीन ग्राहकांना फायदा होणार आहे. सर्वच उत्पन्न गटातील ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. तर ही सवलत 31 मार्च 2022 पर्यंत असणार आहे.