ETV Bharat / business

देशाचा बहुमान! किरण मुझुमदार यांची सलग सहाव्यांदा 'या' यादीत निवड

किरण मझुमदार यांनी औषध निर्मितीमधील नवसंशोधन आणि आंत्रेप्रेन्युअर म्हणून दिलेले योगदान पाहता त्यांची 'मेडिसन मेकर पॉवर लिस्ट'मध्ये निवड करण्यात आली आहे.

किरण मुझुमदार शॉ
किरण मुझुमदार शॉ
author img

By

Published : Apr 28, 2020, 10:01 AM IST

बंगळुरू - देशातील महिला उद्योजका बिकॉनच्या सीईओ किरण मुझुमदार-शॉ यांनी जागतिक जैवऔषध निर्मिती क्षेत्रात देशाचे नाव उंचावले आहे. त्यांची 'मेडिसन मेकर पॉवर लिस्ट २०२०' मध्ये निवड करण्यात आली आहे. या यादीत जैवऔषधी कंपनीमधील जगातील आघाडीच्या २० प्रेरणादायी उद्योजकांची निवड करण्यात आली आहे.

किरण मझुमदार यांनी औषध निर्मितीमधील नवसंशोधन आणि आंत्रेप्रेन्युअर म्हणून दिलेले योगदान पाहता त्यांची 'मेडिसन मेकर पॉवर लिस्ट'मध्ये निवड करण्यात आली आहे. या यादीत लहाण रेणू, जैवऔषधी आणि प्रगत औषधीमध्ये काम करणाऱ्या ६० श्रेष्ठ अशा व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्व असे व्यवसायिक आहेत, की त्यांनी जैवऔषधी उद्योगाला पुढे नेले आहे. त्याचबरोबर नवसंशोधनातून तयार केलेल्या औषधामुळे लोकांचे प्राण वाचवले आहेत. तसेच कोरोना लसनिर्मितीसाठी आणि उपचार हे बाजारात लवकर आणण्यासाठी उद्योजकांनी प्रयत्न केले आहेत.

हेही वाचा-चीनमधील उद्योगांना आर्कषित करण्याकरता राज्याने 'हा' घेतला निर्णय

विशेष म्हणजे मुझुमदार-शॉ यांची सलग सहाव्यांदा मेडिसन मेकर पॉवर लिस्टमध्ये निवड झाली आहे. हा बहुमान खरोखरच सन्मानजनक असल्याची प्रतिक्रिया शॉ यांनी दिली आहे.

हेही वाचा-कोरोनाशी लढा तंत्रज्ञानाने! रुग्णांचे स्क्रीनिंग करण्याकरता रोबोचा रुग्णालयात वापर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.