ETV Bharat / business

'जिओमीट' झुमला देणार टक्कर;100 जण होवू शकतात सहभागी

जिओमीटमध्ये बैठकीचा आयोजक हा ऑनलाईन प्रतिक्षाकक्ष सुरू करू शकतो. त्यामुळे त्याच्या परवानगीशिवाय कोणीही थेट बैठकीत सहभागी होवू शकत नाही.

जिओमीट
जिओमीट
author img

By

Published : Jul 3, 2020, 8:39 PM IST

नवी दिल्ली- टिकटॉकसारख्या चिनी अ‌ॅपवरील बंदीनंतर डिजीटल माध्यमातही भारतीय डिजीटल अ‌ॅप असावेत, अशी देशात मागणी होत आहे. अशातच रिलायन्सने जिओमीट हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‌ॅप लाँच केले आहे. हे अ‌ॅप झुमशी कट्टर स्पर्धा करणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे शाळा, उद्योग आणि अनेक व्यावसायिक व्हिडिओ अॅप कॉन्फरन्सिंगचा वापर करून संवाद साधत आहेत. त्यासाठी झुमचा वापर सर्वाधिक करण्यात येत आहेत. या अॅपवर एका ऑनलाईन बैठकीसाठी सुमारे 45 मिनिटांची मर्यादा आहे. त्यापेक्षा अधिक काळ बैठक व इतर सुविधा घेण्यासाठी वापरकर्त्याला मासिक सुमारे 1 हजार रुपये द्यावे लागतात. त्यामुळे जिओमीट हे झुमशी चांगली स्पर्धा करणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

ही आहेत जिओमीटचे वैशिष्टये

  • व्हिडिओ अपची नोंदणी (साईन इन) करण्यासाठी केवळ मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडी पुरेसा आहे. त्यामुळे लॉग इन सहज करणे शक्य आहे.
  • व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ही एचडी ओडिओ आणि व्हिडिओ गुणवत्तेचे आहे.
  • वापरकर्त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे आगाऊ नियोजन करणे शक्य आहेत.
  • तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी होण्यासाठी इतरांना निमंत्रित करता येते.
  • जिओमीटमध्ये एकाच दिवशी कितीही ऑनलाईन बैठका (मीटिंग) घेता येतात.
  • प्रत्येक बैठक ही कोणत्याही अडथळ्याशिवाय 24 तास चालू शकते.
  • हे अप्लिकेशन अँड्राईड, विंडोज, आयओएस, मॅक अशा सर्व महत्त्वाच्या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालते.
  • प्रत्येक बैठकीसाठी संकेतांक (पासवर्ड) हा सुरक्षित असणार आहे.
  • बैठकीचा आयोजक हा ऑनलाईन प्रतिक्षाकक्ष सुरू करू शकतो. त्यामुळे त्याच्या परवानगीशिवाय कोणीही थेट बैठकीत सहभागी होवू शकत नाही.

जिओमीट हे सुमारे दहा हजार वापरकर्त्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड केले आहे. जिओमीट हे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.