मुंबई - जिओफायबरने वापरकर्त्यांना खूशखबर दिली आहे. जिओफायबरकडून वापरकर्त्यांना ३० दिवसांचे मोफत ट्रायल कनेक्शन देण्यात येणार आहे.
कोरोना महामारीत इंटरनेटचा वापर वाढला आहे. अशा स्थितीत जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओफायबरने प्लॅन जाहीर केला आहे.
असा आहे कंपनीच्या दाव्याप्रमाणे नव्या जिओफायबरचा प्लॅन
- अर्मयादित इंटरनेट मिळणार आहे.
- अपलोड आणि डाउनलोडचा समान वेग देण्यात येणार आहे.
- प्रति महिना ग्राहकांना ३९९ रुपये द्यावे लागणार आहेत.
- ग्राहकांना शुल्क असलेले १२ ओटीटी अॅप मोफत देण्यात येणार आहे.
३० दिवसांचा मोफत जिओफायबर प्लॅन असा असणार
- १५० एमबीपीएस वेग असलेले मोफत इंटरनेट मिळणार आहे.
- ४ हजारांचा सेट टॉप बॉक्ससोबत १० ओटीटी अॅप मिळणार आहेत. त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही.
- मोफत व्हाईस कॉलिंग देण्यात येणार आहे.
- जर ग्राहकाला सेवा आवडली नाही तर कनेक्शन बंद करताना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
- ३० दिवसांचे मोफत ट्रायलची सेवा सर्व ग्राहकांना मिळणार आहे.
जे ग्राहक १ सप्टेंबरपासून जिओफायबरची सेवा सुरू करणार आहेत, त्यांना ३० दिवसांचे मोफत ट्रायल देण्यात येणार आहे. तर सध्या ग्राहक असलेल्या जिओफायबरच्या ग्राहकांना इतर विशेष फायदे मिळणार आहेत. नव्या प्लॅनप्रमाणे जुन्या ग्राहकांनाही सेवा देण्यात येणार आहे. ज्या ग्राहकांनी १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टदरम्यान जिओफायबरची सुविधा घेतली असेल तर त्यांना ३० दिवसाची मोफत ट्रायल सुविधा मिळणार आहे. ही सुविधा मायजिओमध्ये व्हाउचरमधून मिळणार आहे.