ETV Bharat / business

जिओ वापरकर्त्यांना व्हॉट्सअपवर मिळणार लशीच्या उपलब्धतेची माहिती - tools to find vaccine

जिओ चॅटबोटमध्ये कोरोना लशीच्या उपलब्धतेबाबत माहिती दिली जाणार असल्याचे जिओने म्हटले आहे. ही सेवा 700770007 या क्रमांकावर HI मेसेज केल्यानंतर त्वरित सुरू होणार आहे.

जिओ
जिओ
author img

By

Published : Jun 9, 2021, 7:10 PM IST

नवी दिल्ली - जिओने लसीकरणाच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांकरिता खास सुविधा सुरू केली आहे. व्हॉट्सअपॅच्या चॅटबोटमध्ये ग्राहकांना लशीच्या उपलब्धेबाबत माहिती दिली जाणार आहे.

जिओ वापरकर्त्यांना व्हॉट्सअपचा वापर करून पैशांचे व्यवहार करू शकतात. तसेच जिओ चॅटबोटचा वापर करून तक्रारी व चौकशी करू शकतात. जिओ चॅटबोटमध्ये कोरोना लशीच्या उपलब्धतेबाबत माहिती दिली जाणार असल्याचे जिओने म्हटले आहे. ही सेवा 700770007 या क्रमांकावर HI मेसेज केल्यानंतर त्वरित सुरू होणार आहे. हा चॅटबोट जिओ व्यतिरिक्त इतर मोबाईल नेटवर्कच्या वापरकर्त्यांनाही वापरता येणार आहे.

हेही वाचा-नोटा छापणे हा आरबीआयपुढे शेवटचा पर्याय असायला पाहिजे- डी. सुब्बाराव

जिओ चॅटबोटवर सरकारी ऑनलाईन पोर्टलप्रमाणे लस केंद्राची माहिती केवळ पिनकोड टाकून घेता येणार आहे. जिओ सीम, जिओफायबर, जिओमार्ट आणि इंटरनॅशनल रोमिंग चॅटबोटमधून जिओ हे पोर्टेबिलिटी सेवा घेऊ शकतात. एकवेळ पासवर्ड मिळाल्यानंतर ग्राहकांना लशीच्या उपलब्धतेची माहिती मिळू शकणार आहे.

हेही वाचा-खरीप पिकाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ-केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

जिओ फोन वापरकर्त्यांना दर महिन्याला ३०० मिनिटे कॉलिंग मोफत

रिलायन्स इंडस्ट्रीजने जीओ फोन वापरकर्त्यांना कोरोनाच्या काळात मोठा दिलासा दिला आहे. जिओ फोन वापरकर्त्यांना दर महिन्याला 300 मिनिटे कॉलिंग मोफत मिळणार आहे. ही सेवा संपूर्ण महामारीत मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला आणि सर्वांना परवडणाऱ्या दरात कॉलिंगची सेवा उपलब्ध करून देण्याची इच्छा असल्याचे जिओ कंपनीने म्हटले आहे. जिओ ही रिलायन्स फाउंडेशनबरोबर काम करत आहे. त्यामधून जिओ फोन वापरकर्त्यांना रोज 10 मिनिटे म्हणजे मासिक 300 मोफत मिनिटे मिळणार आहेत. त्यामुळे ज्यांना रिचार्ज करणे शक्य झाले नाही, त्यांना फायदा होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.