नवी दिल्ली - रिलायन्सने धमाकेदार ऑफर असलेल्या जिओफोनची घोषणा केली आहे. जिओफोन १,९९९ रुपयांना उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना या जिओफोनवर दोन वर्षे अमर्यादित कॉल व मासिक २ जीबी मोफत डाटा मिळणार आहे. 2 जी मुक्त भारतसाठी रिलायन्सने पुन्हा एकदा वचनबद्धता दाखविली आहे.
२जीमध्ये अडकलेल्या ३० कोटी वापरकर्त्यांना जिओ फोनच्या सेवा मिळणार आहेत. या सेवा कंपनीने न्यू जिओफोन २०२१ ऑफर नावाने लाँच केल्या आहेत. रिलायन्स जिओचे संचालक आकाश अंबानी म्हणाले की, देशात अजूनही ३० कोटी ग्राहक हे २जीच्या युगात अडकले आहेत. त्यामुळे त्यांना इंटरनेट मिळत नाही. ५ जी क्रांतीच्या उंबरठ्यावर जग थांबलेले आहे. जिओने गेल्या चार वर्षात इंटरनेटचे लोकशाहीकरण केले आहे. प्रत्येक भारतीयाला तंत्रज्ञानाचा फायदा मिळवून दिला आहे. त्यामुळे तंत्रज्ञान हे ठराविक लोकांपुरते मर्यादित राहिले नाही.
हेही वाचा-आक्षेपार्ह ट्विट केले तर स्वयंचलितपणे अकाउंट होऊ शकते बंद
नवीन जीओफोन २०२१ ऑफर हे त्यादृष्टीने दुसरे पाऊल आहे. डिजीटल दरी दूर करण्यासाठी जिओ धाडसी पावले टाकत राहणार आहे. या मोहिमेत प्रत्येक भारतीयाचे स्वागत आहे. दरम्यान, जिओफोन २०२१ हा फोन १ मार्चपासून रिलायन्स रिटेल आणि जिओ रिटेलर्समध्ये मिळणार आहे.
हेही वाचा-अर्थव्यवस्थेचा विकास होताना उद्योगांसाठी वित्तपुरवठा वाढविण्याची गरज