नवी दिल्ली - नववर्षाच्या उंबरठ्यावर जिओने ग्राहकांना भेट दिली आहे. जिओच्या नेटवर्कवरून इतर नेटवर्कवर करण्यात येणारे देशांतर्गत कॉलिंग (इंटरकनेक्ट युझेज चार्जेस) मोफत करण्यात आले आहे.
दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) निर्देशानुसार 'बिल आणि कीप' याची अंमलबजावणी देशात १ जानेवारी २०२१ पासून करण्यात आली आहे. त्यानुसार जिओकडून देशांतर्गत कॉलिंगवरील शुल्क माफ करण्यात आले आहे. देशांतर्गत कॉलिंगचे दर शून्य करण्याच्या वचनबद्धतेचा आम्ही आदर करत कॉलिंग मोफत केले आहे. जिओने पुन्हा देशांतर्गत १ जानेवारी २०२० पासून कॉलिंग मोफत केल्याचे कंपनीने म्हटले आहे. जिओवरून कोणत्याही नेटवर्कवरील कॉलिंग हे मोफत असेल, असे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-जिओ ५जी सेवा पुढील वर्षी सुरू करणार -मुकेश अंबानी
दरम्यान, गेल्या वर्षभरापासून रिलायन्स जिओने इतर नेटवर्कवर कॉलिंगकरता प्रति मिनिट ६ पैसे आकारले होते. मात्र, तेवढ्याच किमतीचा मोफत डाटा जिओकडून ग्राहकांना देण्यात आला होता.
हेही वाचा-कोरोना महामारीच्या संकटातही जिओच्या नफ्यात तिपटीने वाढ
रिलायन्सची कोरोना महामारीतही घौडदौड सुरू-
रिलायन्स जिओने पुढील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत ५जी सेवा लाँच करण्याचे नियोजन केले आहे. ही माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी इंडिया मोबाईल काँग्रेसच्या उद्घाटन समारंभात दिली होती. कोरोना महामारीच्या संकटातही रिलायन्स जिओने सप्टेंबरच्या तिमाहीत तिप्पट नफा मिळविला आहे. रिलायन्सला सप्टेंबरच्या तिमाहीत २ हजार ८४४ कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे.