नवी दिल्ली - भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) विमाधारकांचे हितसंरक्षण करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत दिले. नुकतेच, केंद्रीय अर्थसंकल्पात एलआयसीमधील हिस्सा विकण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
शेअर बाजारात एलआयसी सूचिबद्ध झाल्याने पारदर्शकता वाढण्यासाठी मदत होणार आहे. लोकांचा सहभाग वाढेल आणि शेअर बाजार अधिक बळकट होईल, असे केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
हेही वाचा-अर्थसंकल्पानंतरचे आरबीआयचे पहिलेच पतधोरण; गुरुवारी होणार जाहीर
कोठे गुंतवणूक करायची, याचे एलआयसीला स्वातंत्र्य आहे. एलआयसी कायद्यात सुधारणा झाल्यानंतर सरकार किती हिस्सा विकणार आहे, याबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-'वाहन उद्योगातील नोकऱ्या कमी झाल्याच्या आकडेवारीला पुष्टी नाही'