नवी दिल्ली - इन्फोसिस फाउंडेशन भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला इन्फोसिस फाउंडेशन ९.१३ कोटी रुपयांचे दान देणार आहे. या निधीचा पाच वर्षांसाठी विविध संशोधनासाठी संस्थेला उपयोग करण्यात येणार आहे. प्राचीन लिपीतील कागदपत्रांचा अभ्यास समाजासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत सुधा मुर्तींनी व्यक्त केले आहे.
इन्फोसिस फाउंडेशन चेअर ऑफ ओरिएन्टोलॉजी आणि कर्नाटक चेअर ऑफ ओरिएन्टोलॉजी हे दोन अध्यासन भांडारकर प्राच्यविद्या संस्थेत स्थापन करण्यात येणार आहेत. दर सहा महिन्यामध्ये प्राच्यविद्या शाखेमध्ये बाहेरीलदोन संशोधकांना आमंत्रित करण्यात येणार आहे. त्यासाठीही इन्फोसिस स्कॉलर या नावाने मदत करण्यात येणार आहे. दोन मुख्य तपासणीस, सहा सहाय्यक संशोधक, १ हेल्पर आणि १ डिझाईनर आर्टिस्ट यांची नियुक्ती करण्यासाठीही इन्फोसिस मदत करणार आहे.
पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेबरोबर पाच वर्षांचा करार इन्फोसिस करणार आहे. प्राचीन लिपीतील कागदपत्रांचा अभ्यास समाजासाठी अत्यंत उपयुक्त आहे. भांडारकर संस्थेबरोबरील आमचा करार हा प्राचविद्येतील संशोधनासाठी साधने उपलब्ध करून देण्यासाठी आहे. असे इन्फोसिसचे फाउंडेशनचे चेअरमन सुधा मुर्ती यांनी म्हटले आहे.
संस्थेमुळे झाला होता वाद-
जेम्स लेन या कथित संशोधकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक पुस्तक लिहिले होते. त्यामध्ये भांडारकर संस्थेतील संशोधकांची मदत घेतल्याचेही या संशोधकाने म्हटले होते. यावरून संस्थेवर सर्वस्तरातून टीका करण्यात आली होती. त्यानंतर काही संघटनांनी संस्थेची तोडफोड केली होती.