ETV Bharat / business

भारतीय कंपन्यांवरील कर्जाचा बोझा जुलैमध्ये गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट - अदानी पोर्ट्स

भारतीय कंपन्यांनी विदेशातील बाजारपेठेमधून २.१८ अब्ज डॉलरचे कर्ज घेतले होते. यामध्ये स्वयंचलित व्यावसायिक कर्जाच्या (ईसीबी) माध्यमामधून अदानी पोर्ट्स आणि विशेष आर्थिक झोन लि. कंपनीने कर्ज घेतले आहे.

संग्रहित
author img

By

Published : Sep 2, 2019, 5:23 PM IST

नवी दिल्ली - देशाची अर्थव्यवस्था ही संकटामधून जात असताना भारतीय कंपन्यांवरील कर्जाचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. भारतीय कंपन्यांवरील विदेशी कर्जाचा बोझा गतवर्षीच्या तुलनेत जुलैमध्ये दुप्पट झाला आहे. हे प्रमाण ४.९८ अब्ज डॉलर एवढे झाल्याची माहिती आरबीआयच्या आकडेवारीतून दिसून आली आहे.

भारतीय कंपन्यांनी विदेशातील बाजारपेठेमधून २.१८ अब्ज डॉलरचे कर्ज घेतले होते. यामध्ये स्वयंचलित व्यावसायिक कर्जाच्या (ईसीबी) माध्यमामधून अदानी पोर्ट्स आणि विशेष आर्थिक झोन लि. कंपनीने कर्ज घेतले आहे.

हेही वाचा-अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांवरील कर्ज माफ होणार - सुभाष देशमुख

लार्सन अँड टुर्बो कंपनीने १५० दशलक्ष डॉलर आणि एचपीसीएल मित्तल एनर्जी कंपनीने १२५ दशलक्ष डॉलर कर्ज घेतले आहे. आदित्या बिर्ला हाऊसिंग फायनान्स, एल अँड टी फायनान्स, जीएसीएल नाल्को अल्कलाईज अँड केमिकल आणि इंडिया इन्फोलाईन फायनान्सने १०० अब्ज डॉलरचे कर्ज घेतले. रिलायन्स इंडस्ट्रीजने ९१२.८७ दशलक्ष डॉलरचे कर्ज घेतले आहे.

हेही वाचा-काही मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या इच्छेपुढे सरकारने झुकू नये - सीएआयटी

टोयोटा फायनान्शिअल सर्व्हिसेस इंडिया या केवळ एकट्या कंपनीने मसाला बाँडमधून ५०.८६ दशलक्ष डॉलरचे विदेशातील बाजारपेठेमधून कर्ज घेतले आहे.

हेही वाचा- बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांना खूशखबर.. कर्ज होणार स्वस्त

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.