ETV Bharat / business

अयोध्या निकाल : केंद्रीय मंत्र्यांसह उद्योगातून स्वागत

author img

By

Published : Nov 9, 2019, 6:58 PM IST

केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी ट्विट करत सर्वोच्च न्यायालयाने एकमताने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. अनेक दशके सुरू असलेला कायदेशीर वाद संपुष्टात येणार आहे. लोकांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश स्वीकारावा आणि शांतता राखावी, असे त्यांनी आवाहन केले.

संग्रहित - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येवर दिलेल्या निकालाचे केंद्रीय मंत्र्यांसह भारतीय उद्योजकांनी स्वागत केले आहे. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांना वंदन (सॅल्युएट) करणारे ट्विट केले आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की या निकालाची १.३ अब्ज लोक वाट पाहत होते. या खंडपीठात असण्यासाठी किती धाडस असेल. निष्कर्षापर्यंत येण्यासाठी त्यांनी अतुलनीय पद्धतीने मनाचा वापर केला असावा. मी त्यांना (न्यायाधीशांना) आणि त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला वंदन करतो. त्यांनी देशातील न्याय प्रक्रिया उंचावली आहे.

Anand Mahindra Tweet
आनंद महिंद्रा यांचे ट्विट

केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी ट्विट करत सर्वोच्च न्यायालयाने एकमताने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. अनेक दशके सुरू असलेला कायदेशीर वाद संपुष्टात येणार आहे. लोकांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश स्वीकारावा आणि शांतता राखावी, असे त्यांनी आवाहन केले. न्यायव्यवस्था, सर्व संस्था, समाज आणि या प्रकरणात सहभागी झालेल्या सर्व लोकांचे आभार मानतो, असे गोयल यांनी म्हटले.

Piyush Goyal Tweet
पियूष गोयल यांचे ट्विट
Piyush Goyal Tweet
पियूष गोयल यांचे ट्विट

केंद्रीय वाहतूक, रस्ते आणि एमएमएमई मंत्री नितीन गडकरी यांनीही निकालावर ट्विट केले आहे. अयोध्येच्या निकालाचा आपण आदर केला पाहिजे. शांतता आणि स्थैर्य टिकवावे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Nitin Gadkari Tweet
नितीन गडकरी ट्विट

इफ्फकोचे व्यवस्थापकीय संचालक यू. एस. अवस्थी यांनी ट्विट करत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले. हिंदूंना वादग्रस्त जमीन आणि मुस्लिमांना पर्यायी ५ एकर जमीन देण्याचा न्यायालयाने निकाल दिला आहे. हा संपूर्ण वादावर चांगला तोडगा आहे. आपण शांतता व एकता ठेवू, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Awasthi Tweet
अवस्थी यांचे ट्विट

हेही वाचा-अयोध्या निकाल: वादग्रस्त जागा केंद्राच्या ट्रस्टला; तर मुस्लीम पक्षकारांना अयोध्येत मिळणार पर्यायी जागा

उद्योगांची संघटना पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डी. के. अग्रवाल यांनी निकाल हा सर्वांसाठी विजयाचा असल्याचे म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने अयोध्या प्रकरणात एकमताने निकाल दिला. उत्तर प्रदेशमधील अयोध्येत मशीद बांधण्यासाठी ५ एकर जमीन द्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सरकारला आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जमीन ही सध्या केंद्र सरकारच्या ताब्यात राहणार आहे. केंद्र सरकारला तीन महिन्यात ट्रस्ट निर्माण करावी लागणार आहे. ट्रस्टकडे मंदिराचे बांधकाम करण्याचे काम असणार आहे.

Intro:Body:

India Inc hailed the Supreme Court for deciding on a centuries-old dispute over ownership of a plot of land in Ayodhya, paving the way for construction of a temple.

New Delhi: India Inc on Saturday hailed the Supreme Court for deciding on a centuries-old dispute over ownership of a plot of land in Ayodhya, paving the way for construction of a temple at a site which Hindu groups believe is the revered birthplace of Lord Ram.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.