नवी दिल्ली - सौदी अरॅम्को कंपनीने जगातील सर्वात मोठ्या आयपीओची माहिती पुस्तिका (प्रॉस्पेक्टस) जाहीर केले. कंपनीचे मूल्यांकन अंदाजे हे १.२ ते २.३ लाख कोटी रुपये आहे. या कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीज ऑईल आणि केमिकलममधील २० टक्के हिस्सा विकत घेतला आहे.
अरॅम्कोने सौदी अरेबियाच्या शेअर बाजारात आयपीओ खरेदी करण्यासाठी ६५८ पानी माहिती पुस्तिका (प्रॉस्पेक्ट्स) रविवारी लाँच केली आहे. कंपनीने आशियामधील बाजारपेठेत विस्तार करण्यासाठी प्रवेश केला आहे. कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीज ऑईल आणि केमिकलचे २० टक्के शेअर हे १२ ऑगस्ट २०१९ ला खरेदी केल्याचे माहिती पुस्तिकेत म्हटले आहे. वेगाने वाढणाऱ्या भारतीय बाजारपेठेत विस्तार करणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-दिवाळीतही वाहन उद्योगावर मंदीचा प्रभाव; ऑक्टोबरमध्ये विक्रीत १२.७६ टक्के घसरण
अरॅम्को कंपनीचे जगात सर्वात अधिक आहे मूल्यांकन-
अरॅम्को ही जगातील सर्वात मोठी खनिज तेल आणि नैसर्गिक वायू कंपनी आहे. ही कंपनी पूर्णपणे सौदी अरेबियाच्या राजघराण्याच्या मालकीची आहे. जगातील सर्वात अधिक नफ्यामधील कंपनी अशी अरॅम्कोची ओळख आहे. कंपनीचे मूल्यांकन हे मायक्रोसॉफ्टहून दुप्पट आहे. तर जगातील सर्वात मूल्यांकन असलेली तेल कंपनी एक्सेसॉन मोबाईलहून अधिक सातपट अरॅम्कोचे मूल्यांकन आहे.
हेही वाचा-शेअर बाजार गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा; निर्देशांकात १०० अंशाची घसरण
आयपीओ हा २५ अब्ज डॉलरचा आहे. मात्र, त्याच्या शेअरचे किंमत व संख्या अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. जगात उत्पादित होणाऱ्या प्रत्येक खनिज तेलाच्या ८ बॅरलपैकी एक बॅरल हा अॅरेम्को कंपनीचा असल्याचे २०१६ ते २०१८ दरम्यान दिसून आले.