ETV Bharat / business

कर्नाटक : आयएमए ज्वेल्सकडून १ हजार २३० कोटींची फसवणूक, सात संचालकांना अटक - I Monetary Advisory

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएमएकडून गुंतवणुकीवर सुमारे ८ ते १० टक्के व्याज देण्यात येत होते. फसवणूक झालेल्या २१ हजार जणांच्या तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. आयएमएचा संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद मन्सूर खान हा दुबईला पळून गेल्याची चर्चा आहे.

आएमए ज्वेल्स
author img

By

Published : Jun 14, 2019, 2:15 AM IST

Updated : Jun 14, 2019, 7:21 AM IST

बंगळुरू - गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून कर्नाटकमधील सुमारे २५ हजार जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. ही फसवणूक द आय मॉनेटरी अॅडव्हायझरी (आयएमए) ज्वेल्सने केली आहे. या फसवणुकीत गुंतवणुकदारांची सुमारे १ हजार २३० कोटींची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. आयएमए ज्वेलर्सच्या सात संचालकांना अटक करण्यात आली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आयएमएकडून गुंतवणुकीवर सुमारे ८ ते १० टक्के व्याज देण्यात येत होते. फसवणूक झालेल्या २१ हजार जणांच्या तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. आयएमएचा संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद मन्सूर खान हा दुबईला पळून गेल्याची चर्चा आहे.

कर्नाटक सरकारकडून विशेष चौकशी पथकाची स्थापना -
हजारो गुंतवणुकदारांनी सुमारे ५० हजार कोटींची गुंतवणूक आयएमएमध्ये केली होती. दर महिन्याला गुंतवणुकीवर आकर्षक व्याज मिळत असल्याने लोकांचा आयएमएर विश्वास होता. त्यामुळे गुंतवणुकीच्या आमिषाने आयएमएमच्या पॉन्झी स्कीमध्ये पैसे गुंतविले होते. असे असले तरी आयएमएचा संस्थापक मन्सूरने १२ वर्षांहून अधिक काळ गुंतवणुकदारांना व्याज दिले आहे. मात्र यावर्षी तो गुंतवणुकदारांची फसवणूक करून पळून गेला आहे.या प्रकरणाबाबत कर्नाटक राज्य सरकारने विशेष चौकशी पथकाची स्थापना केली आहे.

पॉन्झी योजनेच्या फसवणुकीला राजकीय वळण-
पोलिसांनी आयएमएच्या सर्व शाखांवर जप्ती आणली आहे. मन्सूर खान हा आयएमएचे सर्व सोने आणि हिरे घेवून ९ एप्रिलला देशातून पळून गेल्याचे बोलले जात आहे. या फसवणुकीच्या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. कारण काँग्रेसचा वजनदार नेते काँग्रेस नेता रोशन बेग आणि कर्नाटक अन्न आणि नागरी पुरवठा तसेच अल्पसंख्यांक मंत्री बी.झेड. झमीर अहमद खान यांचा आयएमएशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी आणि माजी मुख्यमंत्री सिद्रामैया यांच्या फोटोबरोबर मन्सून खान हा यापूर्वी फोटोत झळकला होता. आयएमए ही कंपनी औषधी, शिक्षण आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रात आहे. दुबईतून परतल्यानंतर मन्सूर हा बंगळुरूमध्ये गेली १२ वर्षे विविध व्यवसाय करत आहे.

Intro:Body:

biz

Conclusion:
Last Updated : Jun 14, 2019, 7:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.