नवी दिल्ली - खासगी बँक आयसीआयसीआय बँकेने चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत गतवर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत दुप्पट निव्वळ नफा मिळवला आहे. चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत बँकेने ४,१४६.४६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला.
आयसीआयसीआय बँकेने मागील वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत १,६०४.९१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला होता. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न १७.२३ टक्क्यांनी वाढून २३,६३८.२६ कोटी रुपये झाले आहे. तर मागील आर्थिक वर्षात बँकेने २०,१६३.२५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले होते.
हेही वाचा-आरबीआयच्या पतधोरण समितीला मर्यादा - शक्तिकांत दास
बँकेची अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) ही डिसेंबर २०१९ अखेर कमी होवून ५.९५ टक्के झाली आहे. गतवर्षी आयसीआयसीआय बँकेची अनुत्पादक मालमत्ता ही ७.७५ टक्के होती.
हेही वाचा-अर्थसंकल्प २०२० : व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अधिक सवलत देण्यावरून गोंधळ