मुंबई - आयसीआयसीआय बँकेने डिजीटल वॉलेट 'पॉकेट्स'साठी खास सुविधा लाँच केली आहे. नव्या सुविधेमुळे डिजीटल 'पॉकेट्स' हे युपीआयशी संलग्न होणार आहे. आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक नसलेल्या व्यक्तींनाही आयसीआयसीआय बँकेचे 'पॉकेट्स' वापरू शकणार आहेत.
ज्यांच्याकडे युपीआय आयडी आहे, त्यांना 'पॉकेट्स'साठी नवा आयडी मिळणार आहे. नव्या आयडीमधून ग्राहकांना 'पॉकेट्स'अॅपमधून लॉग इन करता येणार आहे. युपीआय असल्याने ग्राहकांना पॉकेट्सचा सुरक्षित पद्धतीने वापर करता येणार आहे.
हेही वाचा-कोव्हॅक्सिनला जुलै ते सप्टेंबरमध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळणार मंजुरी-भारत बायोटेक
वॉलेट हे युपीआयशी संलग्न करणारी देशातील पहिली बँक
बचतखात्याचा पॉकेट्समधून वापर होत असल्याने ग्राहकांची सोय होणार आहे. या अॅपला युपीआय आयडीशी संलग्न केल्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह विविध वर्गातील ग्राहकांना सेवेचा फायदा मिळेल, असे आयसीआयसीआय बँकेने म्हटले आहे. वॉलेट हे युपीआयशी संलग्न करणारी आयसीआयसीआय ही देशातील पहिली बँक आहे.
हेही वाचा-नवीन नियमांचे पालन करण्याकरिता अंमलबजावणी प्रक्रिया सुरू- फेसबुक
असे मिळवा डिजीटल वॉलेट अॅप
नव्या वापरकर्त्यांनी पॉकेट्स डाऊनलोड केल्यानंतर लॉग इन करावे. लॉग इन झाल्यानंतर मोबाईल क्रमांकावरून व्हीपीआय स्वयंचलितपणे तयार होतो. युपीआय आयडी तयार करण्यासाठी बँक खात्याची गरज लागत नाही.
वापरकर्ते युपीआय आयडीमध्ये त्यांच्या आवडीप्रमाणे बदल करू शकतात. पूर्वीच्या वापरकर्त्यांना नवीन व्हर्जनचे अॅप डाऊनलोड करून सेवेचा लाभ घेणे शक्य होणार आहे.