नवी दिल्ली - कोवोव्हॅक्स ऑक्टोबरमध्ये लाँच होईल, अशी आशा सिरम इन्स्टिट्यूट इंडियाचे सीईओ अदार पुनावाला यांनी व्यक्त केली आहे. तर लहान मुलांसाठी कोवोव्हॅक्स ही 2022 च्या पहिल्या तिमाहीत उपलब्ध होणार असल्याचे पुनावाला यांनी सांगितले. देशामध्ये कोव्हिशिल्डची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी कंपनीकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची त्यांनी माध्यमांनी माहिती दिली.
सिरम इन्स्टिट्यूट इंडियाचे सीईओ पुनावाला यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची संसदेमध्ये भेट घेतली. ही भेट सुमारे 30 मिनिटे चालली. सिरमला सर्वप्रकारे मदत केल्याबद्दल अदार पुनावाला यांनी सरकारचे आभार मानले आहेत.
हेही वाचा-रिलायन्सला धक्का! फ्युचर ग्रुपबरोबरच्या 24,713 कोटींच्या सौद्याला 'सर्वोच्च' स्थगिती
लहान मुलांसाठी कोवोव्हॅक्स ही लस पुढील वर्षी जानेवारी ते मार्चमध्ये उपलब्ध होणार
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पुनावाला म्हणाले, सरकार आम्हाला प्रयत्न करत आहे. आम्हाला कोणतीही आर्थिक अडचण नाही. सर्व प्रकारचे सहकार्य आणि मदत करत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही आभारी आहोत. लहान मुलांसाठी कोवोव्हॅक्स ही लस पुढील वर्षी जानेवारी ते मार्चमध्ये उपलब्ध होणार आहे. हे डीजीसीआयच्या मान्यतेवर अवलंबून असेल, असेही पुनावाला यांनी स्पष्ट केले. हा डोस दोन वेळेचा असणार आहे. त्याची किंमत लाँचिंगवेळी निश्चित केली जाणार आहे.
अदार पुनावाला यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची भेट घेतली. कोव्हिशिल्डच्या पुरवठ्याकरिता ही भेट फलदायी ठरल्याचे आरोग्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
-
Met @AdarPoonawalla, CEO of @SerumInstIndia and had a productive discussion on the supply of Covishield vaccine.
— Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) August 6, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
I appreciated their role in mitigating #COVID19 & assured continued Government support in ramping up vaccine production. pic.twitter.com/i3HQeeOALH
">Met @AdarPoonawalla, CEO of @SerumInstIndia and had a productive discussion on the supply of Covishield vaccine.
— Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) August 6, 2021
I appreciated their role in mitigating #COVID19 & assured continued Government support in ramping up vaccine production. pic.twitter.com/i3HQeeOALHMet @AdarPoonawalla, CEO of @SerumInstIndia and had a productive discussion on the supply of Covishield vaccine.
— Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) August 6, 2021
I appreciated their role in mitigating #COVID19 & assured continued Government support in ramping up vaccine production. pic.twitter.com/i3HQeeOALH
हेही वाचा-सोने प्रति तोळा 283 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरातही मोठी घसरण
दरम्यान, कोवोव्हॅक्सची दुसरी ते तिसऱ्या टप्प्यातील चाचणी 2 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांवर घेण्याची परवानगी केंद्रीय औषधी नियामक संस्थेच्या तज्ज्ञ समितीने सीरमला दिली आहे. त्यासाठी काही अटीही लागू करण्यात आल्याचे सुत्राने म्हटले आहे.