नवी दिल्ली - दुचाकीमधील आघाडीची कंपनी हिरो मोटोकॉर्पने बीएस-६ इंजिनक्षमतेची स्प्लेंडर लाँच केली. या दुचाकीची ५९,६०० रुपये किंमत आहे.
हिरो मोटोकॉर्प कंपनीने बीएस-६ इंजिनक्षमतेच्या दोन स्कूटर डेस्टिनी १२५ आणि मॅस्ट्रो एज १२५ लाँच केल्या आहेत. यामध्ये डेस्टिनीची किंमत (दिल्ली एक्सशोरूम) ६४,३१० रुपये आणि मॅस्टोर एज १२५ ची किंमत (दिल्ली एक्सशोरूम) ६७,९५० रुपये किंमत आहे.
हेही वाचा-टेलिफॉन ऑपरेटर कंपन्या 'गॅस'वर; दूरसंचार विभागाने 'हे' दिले आदेश
हिरो मोटोकॉर्पचे जागतिक उत्पादन नियोजनाचे प्रमुख मॅलो ली मॅसन म्हणाले, आम्ही जवळजवळ बीएस-६ इंजिनक्षमतेची सर्व वाहने लाँच केली आहे. हे मुदतीपूर्व केले आहे. येत्या आठवड्यात नवी उत्पादने लाँच करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे ग्राहकांनी नवीन उर्जा मिळेल, असेही ते म्हणाले.
हेही वाचा-फ्लिपकार्टसह अॅमेझॉनच्या चौकशीला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती
नवीन सर्व उत्पादनांची संरचना आणि विकसन हे जयपूरमधील सीआयटीच्या संशोधन आणि विकास केंद्रात करण्यात आले आहे.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल २०२० नंतर केवळ बीएस-६ इंजिनक्षमतेच्या वाहनांचीच विक्री करता येणार आहे. प्रदूषणाचे उत्सर्जन कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले होते.