सॅनफ्रान्सिस्को - गुगलची जगभरातील कार्यालये ही 6 जुलैपासून सुरू होणार आहेत. तर, घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला फर्निचर आणि इतर खर्चापोटी १ हजार डॉलर (सुमारे ७५ हजार रुपये) देण्यात येणार आहेत.
गुगलकडून कमीत कमी कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची परवानगी दिली जाणार आहे. आठवड्यातून एकदाच कर्मचाऱ्यांना गुगलच्या कार्यालयात येता येईल. त्यामुळे गुगलच्या कार्यालयात केवळ एकूण १० टक्के मनुष्यबळ असेल.
हेही वाचा-ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नव्हे 'जाळे'; टाळेबंदीतही ग्राहकांची होतेय फसवणूक
परिस्थिती योग्य राहिली तर गुगलच्या कार्यालयात 30 टक्के मनुष्यबळाला परवानगी दिली जाणार आहे, असे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी म्हटले आहे. या वर्षात बहुतांश कर्मचारी घरातूनच काम करतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. यापूर्वी गुगलने १ जूनपासून कार्यालये सुरू करण्याचे नियोजन केले होते.
हेही वाचा-विमान प्रवास करणाऱ्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण
कोरोनाच्या संसर्गामुळे शारीरिक अंतर, टाळेबंदी असे जगभरात उपाय करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक आयटी कंपन्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याची परवानगी देत आहेत.