ETV Bharat / business

गुगल पिक्सेल '३ a', '३ a XL' १५ मेपासून भारतात उपलब्ध, एवढी असणार किंमत - गुगल पिक्सेल

पूर्वीच्या गुगल पिक्सेलहून नव्या मॉडेलची किंमत कमी आहे. हे मॉडेल प्रिमिअम स्मार्टफोन असलेल्या अॅपल, सॅमसंग आणि वनप्लसशी स्पर्धा करणार आहे. गुगल पिक्सेलमध्ये अधिक बॅटरीचे आयुष्य आणि चांगला कॅमेरा आहे.

गुगल पिक्सेल, सौजन्य- गुगल ट्विटर
author img

By

Published : May 8, 2019, 2:41 PM IST

नवी दिल्ली - अॅपल आणि सॅमसंगच्या प्रीमिअम स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी गुगल पिक्सेलचे ३a आणि ३a XL हे मॉडेल भारतात उपलब्ध करणार आहे. हे मॉडेल १५ मेपासून ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. त्याची किंमत ३९, ९९९ रुपयांहून अधिक असणार आहे.

पूर्वीच्या गुगल पिक्सेलहून नव्या मॉडेलची किंमत कमी आहे. हे मॉडेल प्रिमिअम स्मार्टफोन असलेल्या अॅपल, सॅमसंग आणि वनप्लसशी स्पर्धा करणार आहे. गुगल पिक्सेलमध्ये अधिक बॅटरीचे आयुष्य आणि चांगला कॅमेरा आहे.

प्रत्येकासाठी बांधणी (बिल्डिंग फॉर एव्हरीवन) हे कंपनीचे मुख्य तत्वज्ञान आहे, असे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी डेव्हलपरच्या वार्षिक बैठकीमध्ये सांगितले.

हे आहेत पिक्सेल मॉडेलचे फीचर्स

पिक्सेल ३a मध्ये ५.६ इंचचा डिसप्ले आहे. ४ जीबी रॅम असून इंटरनल स्टोरेज ६४ जीबी आहे. कॅमेरा १२.२ मेगापिक्सेलचा आहे. तर समोरील कॅमेरा हा ८ मेगापिक्सेलचा आहे. बॅटरीची क्षमता ३,००० mAh आहे. Pixel ३a XL या मॉडेलची किंमत ४४,९९९ रुपये आहे. यामध्ये ६ इंचचा डिसप्ले आहे. तर बॅटरीची क्षमता ३,७०० mAh आहे.

गुगल पिक्सेलमध्ये एअरटेल आणि रिलायन्स जिओही चालणार-

पिक्सेलमधील ई-सिम हे एअरटेल आणि रिलायन्स जिओनेही सुरू राहिल, असे कंपनीने म्हटले आहे. गुगलने अँड्राईड क्यूच्या अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टिमचीही घोषणा केली आहे. ही सिस्टीम फोल्डेबल डिसप्लेसाठी असणार आहे. तसेच ती पूर्वीच्या सिस्टिमहून अधिक सुरक्षित असणार आहे.

गुगलने गतवर्षी ऑक्टोबरमध्ये पिक्सेल ३ आणि ३XL या मॉडेलचा शुभारंभ केला होता. त्यांची किंमत ७१ हजार ते ९२ हजार दरम्यान होती. सध्या या मॉडेलची किंमत ही ५७ हजार ते ७४ हजार रुपये एवढी आहे. प्रिमिअम स्मार्टफोनची देशातील बाजारपेठ ३० टक्क्याने वाढेल, असा अंदाज आहे. त्यामुळे भारतासारख्या स्मार्टफोनच्या वाढत्या बाजारपेठेवर गुगल लक्ष केंद्रित करत आहे.

Intro:Body:

business

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.