मुंबई - टाळेबंदीने विमान उड्डाण बंद करण्यात आल्याचा विमान कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. गो एअरने सुमारे ५,५०० कर्मचाऱ्यांना ३ मेपर्यंत विनावेतन काम करण्यास सांगितले आहे.
वाडिया ग्रुपची मालकी असलेल्या गोएअरने कर्मचाऱ्यांना रोटेशनलप्रमाणे वेतनकपात होणार असल्याचे मार्चमध्ये सांगितले होते. टाळेबंदी ३ मेपर्यंत आणखी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे सर्व विमाने जमिनीवर आहेत. त्यामुळे विनावेतन सुट्टी (लिव्ह विदाऊट पे) घेण्याची प्रक्रिया करा, अशी कंपनीने कर्मचाऱ्यांना विनंती केली आहे.
हेही वाचा-बीएसएनएलचे रिचार्ज नाही केले तरी ५ मे पर्यंत सुरू राहणार इनकमिंग
एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार जेव्हा विमान सेवा नसते, तेव्हा एकूण कर्मचाऱ्यांच्या १० टक्के कर्मचाऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे काम असते. अशा कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी काही प्रमाणात वेतन दिले जाण्याची शक्यता आहे. विमान उड्डाण ही ४ पासून सुरू होतील, अशी अपेक्षा असल्याचेही अधिकाऱ्याने म्हटले आहे.
बाजाराच्या अटींवर आणि नव्या वातावरणात पुढे जाण्यावर कंपनी काम करत असल्याचेही गोएअरने म्हटले आहे.