नवी दिल्ली - रिलायन्स इंडस्ट्रीजची मालकी असलेल्या जिओने टाळेबंदीतही व्यवसायिक यशाची मोठी झेप घेतली आहे. जनरल अटलांटिक कंपनीने जिओमध्ये ६ हजार ५९८.३८ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले.
जनरल अटलांटिक जिओचा १.३४ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. यामुळे जिओमध्ये विविध तंत्रज्ञान कंपन्यांची एकूण गुंतवणूक ६७ हजार १९४.७५ कोटी रुपये झाली आहे. यापूर्वी फेसबुक, सिलव्हर लेक, विस्टा इक्वटी पार्टनर कंपन्यांनी जिओमध्ये गुंतवणूक केली आहे.
हेही वाचा-केंद्र सरकारकडे राज्यांचा चार महिन्यांचा जीएसटी मोबदला थकित
जिओचे देशात ३.८८ कोटी ग्राहक आहेत. रिलायन्सने व्हॉट्सग्रुपबरोबर जिओ मार्ट ही सेवा नुकतीच लाँच केली आहे. जिओ मार्टमधून ग्राहकांना व्हॉट्सअॅपवरून किराणा इतर मालाची खरेदी करता येणे शक्य आहे.
हेही वाचा-कोरोनाचे संकट : १३.५ कोटी नोकऱ्यांवर संक्रात; १२ कोटी जण गरिबीत ढकलले जाणार