सॅन फ्रान्सिस्को - अब्जाधीश बिल गेट्स हे पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना संपत्तीत मागे टाकले. बिल गेट्स यांची ११० अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे. तर जेफ बेझोस यांची १०८.७ अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे.
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या जेफ बेझोस यांना ऑक्टोबरमध्ये संपत्तीत टाकले. तिसऱ्या तिमाहीत अॅमेझोनच्या शेअरची घसरण झाल्याने जेफ यांच्या संपत्तीत ७ अब्ज डॉलरची घट झाली आहे.
अमेरिकेतील माध्यमाच्या माहितीनुसार मायक्रोसॉफ्टचे शेअर चालू वर्षात ४८ टक्क्यांनी वधारले आहेत. हे शेअर वधारल्याने कंपनीत हिस्सा असलेल्या बिल गेट्स यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. ही आकडेवारी ब्लूमबर्ग बिलियिनर्स इन्डेक्सने जाहीर केली. गेली २४ वर्षे जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या बिल गेट्स यांना जेफ बेझोस यांनी २०१८ मध्ये मागे टाकले होते. त्यांची संपत्ती तेव्हा १६० अब्ज डॉलर एवढी होती.
हेही वाचा-'कोणत्याही कंपनीचे कामकाज बंद पडू नये, अशी माझी इच्छा आहे'
फोर्ब्सच्या पहिल्या यादीतही होते बिल गेट्स-
फोर्ब्सने १९८७ ला तयार केलेल्या पहिल्या अब्जाधीशांच्या यादीत बिल गेट्स यांनी पहिल्यांदा स्थान पटकाविले होते. त्यावेळी त्यांची संपत्ती ही १.२५ अब्ज डॉलर एवढी होती. तर बेझोस यांचे 'फोर्ब्स ४००' या अमेरिकन श्रीमंताच्या यादीत १९९८ मध्ये नाव झळकले होते. त्यानंतर अॅमेझॉन कंपनीने बाजारात शेअर आणल्यानंतर बेझोस यांची संपत्ती ही १.६ अब्ज डॉलर झाली होती.
हेही वाचा-'या' खनिजाचा राजस्थानात आढळला प्रचंड साठा; आयातीऐवजी भारत भविष्यात करणार निर्यात
घटस्फोट दिल्याचा बेझोस यांना बसला फटका
बेझोस दाम्पत्याने एप्रिलमध्ये घटस्फोट घेतला. या घटस्फोटनांतर जेफ यांनी पत्नी मॅकेन्झीला सुमारे ३६ अब्ज डॉलर मुल्यांचे शेअर दिले. ही घटस्फोटानंतर पतीकडून पत्नीला दिलेली आजपर्यंतची जगातील सर्वात मोठी रक्कम ठरली आहे.