नवी दिल्ली- वाॅलमार्टची मालकी असलेल्या फ्लिपकार्टने व्हॉइस असिस्टंटची सुविधा ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवर दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना खरेदी करणे सोपे होणार आहे
फ्लिपकार्ट ग्रोसरी स्टोअरमध्ये 'सुपर मार्ट' ही व्हॉइसची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या व्हॉइस असिस्टंटमधून हिंदी आणि इंग्रजी भाषेतून ऑनलाइन शॉपिंग करता येते. संभाषणासाठी असलेले हे कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेचे प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या टीमने तयार केले आहे. त्यामध्ये नैसर्गिक भाषेचे आकलन, मशीन भाषांतर या सुविधांचा समावेश आहे. ग्राहकांना एखादे उत्पादन शोधण्यासाठी त्याचा उपयोग करता येणार आहे.
सध्या, हे व्हॉइस असिस्टंट अँड्रॉइड मोबाइलवर उपलब्ध आहे लवकरच ते वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे. व्हॉइस असिस्टंट सुरू करण्यासाठी फ्लिपकार्टने गेल्या पाच महिन्यांपासून देशातील विविध शहरांमध्ये सर्वेक्षण केले आहे.