ETV Bharat / business

फ्लिपकार्ट लखनौमध्ये सुरू करणार ५० हजार स्क्वेअर फुटांचे गोदाम; ५०० जणांना नोकऱ्या - Flipkart fulfilment centre in Lucknow

फ्लिपकार्ट लखनौमध्ये ५० हजार स्क्वेअर फुटांचे फुलफिलमेंट सुरू करणार आहे. यामध्ये लखनौ, कानपूर आणि अलाहाबादमधील ग्राहकांना किराणा माल घरपोहोच पोहोचविण्यात येणार आहे.

फ्लिपकार्ट
फ्लिपकार्ट
author img

By

Published : Nov 9, 2020, 7:26 PM IST

नवी दिल्ली - वॉलमार्टची मालकी असलेल्या फ्लिपकार्टने लखनौमध्ये पहिले किराणा मालाचे गोदाम (फुलफिलमेंट सेंटर) करण्याची घोषणा केली आहे. यामधून थेट ५०० जणांना नोकऱ्या मिळणार आहेत.

लखनौमध्ये फ्लिपकार्ट ५० हजार स्क्वेअर फुटांचे फुलफिलमेंट सुरू करणार आहे. यामध्ये लखनौ, कानपूर आणि अलाहाबादमधील ग्राहकांना किराणा माल घरपोहोच पोहोचविण्यात येणार आहे. या फुलफिलमेंट सेंटरमधून प्रत्यक्ष ५०० जणांना तर अप्रत्यक्ष हजारो जणांना पुरवठा साखळी व सुरक्षा अशा विविध नोकऱ्या मिळणार आहेत. कंपनीच्या किराणा मालाच्या व्यवसायातून स्थानिक फळ प्रक्रिया उद्योगांना चालना मिळेल, असा फ्लिपकार्टने विश्वास व्यक्त केला आहे.

फ्लिपकार्टचे मुख्य कॉर्पोरेट व्यवहार अधिकारी रजनीश कुमार म्हणाले, की देशातील आर्थिक चलनवलनात ई-कॉमर्स हा मुख्य भाग झाला आहे. उत्तर प्रदेशचे उद्योग मंत्री सतिश महाना म्हणाले, की उत्तर प्रदेश हे सर्वात वेगाने प्रगती करणारे राज्य आहे.

फ्लिपकार्टने विक्रीचा यंदा केला आहे विक्रम-

बिग बिलियन डे' या सवलतीच्या ५ दिवसांमध्ये फ्लिपकार्टने व्यवसायाचा यंदा नवा विक्रम केला आहे. फ्लिपकार्टने १ कोटी वस्तू ग्राहकांना घरपोहोच दिल्या आहेत. गतवर्षी केवळ १० लाख वस्तू ग्राहकांना बिग बिलियन डेमध्ये देण्यात आल्या होत्या, असे कंपनीने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.