बंगळुरू - दसरा-दिवाळी सणाच्यानिमित्ताने फ्लिपकार्ट बंपर सेल सुरू करणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या पुरवठा साखळी, लॉजिटिक्स आणि ग्राहक मदतीसाठी फ्लिपकार्ट थेट ५० हजार जणांना नोकरीत घेणार आहे.
सणानिमित्त वार्षिक सेलचे फेसबुककडून आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत अप्रत्यक्षपणे ३० टक्के अधिक रोजगार मिळणार आहे. गतवर्षी ६.५ लाख लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळाला होता. फ्लिपकार्टचा सहा दिवसाचा वार्षिक सेल हा २९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
हेही वाचा-कोल इंडियासह सिंगरेनी माईन्समधील संपाने कोळसा उत्पादन ठप्प
ग्राहकांच्या जीवनात अधिक मोल आणण्यासाठी बिग बिलियन डेची रचना करण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकांना निवडीचा मोठा पर्याय असणार असल्याचे फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमुर्ती यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, आमचा पूर्ण इकोसिस्टिमला फायदा देण्याचा प्रयत्न आहे. 'बिग बिलियन डे' अशाच पद्धतीने काम करत आहे. यातून संपूर्ण भौगोलिक प्रदेशात अधिक रोजगाराच्या संधी आणि विक्रीतून व्यवसाय करण्याचा संधी मिळणार आहेत. मजबूत अर्थव्यवस्थेची निर्मिती करण्यासाठी स्थानिक उद्योगांना चालना देण्याचे ध्येय आहे.
हेही वाचा-'कॉर्पोरेट कर कमी केल्याने भारत विदेशी गुंतवणुकीकरता आकर्षणाचे स्थान ठरेल'
पुरवठा साखळीत थेट रोजगार दिला जाणार आहे. त्यांना पुरवठा साखळीत काम करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये स्कॅनिंग, ईआरपी व विविध मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर करण्याचा समावेश आहे. तसेच ग्राहकांना सेवा देणे, डिलिव्हरी आणि इन्स्टॉलेशन याचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
हेही वाचा-जुन्या साखर कारखान्यांचे लवकरच पुनरुज्जीवन करण्यात येणार