नवी दिल्ली - जिओमध्ये ४३ हजार कोटी रुपयांहून अधिक फेसबुकने गुंतवणूक केल्याचा रिलायन्स इंडस्ट्रीजला चांगलाच फायदा होणार आहे. रिलायन्स ही २०२१ पर्यंत कर्जमुक्त होण्याच्या दिशेने जाईल, असे क्रेडिट सूसच्या अहवालात म्हटले आहे.
रिलायन्सचा फेसबुकबरोबर सौदा झाल्याने रिलायन्सच्या कर्जाचे प्रमाण कमी होणार आहे. रिलायन्सने २०२१ पर्यंत कर्जमुक्त होण्याचे ठेवलेले उद्दिष्ट पूर्ण होईल, असे क्रेडिट सूसने अहवालात म्हटले आहे. फेसबुक जिओचा ९.९९ टक्के हिस्सा घेवून ४३ हजार ५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कर्जाचे प्रमाण कमी होण्याबरोबरच तंत्रज्ञानाच्या आघाडीवरही रिलायन्स इंडस्ट्रीजचा फायदा होणार आहे.
हेही वाचा-'टाळेबंदीत दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत २० टक्क्यांची वाढ'
व्हॉट्सअॅपच्या वापरकर्त्यांची प्रचंड संख्या पाहता जिओमार्टचा फायदा होईल, असे अहवालात नमूद केले आहे. फेसबुकच्या नव्या उत्पादनांसाठी जिओची तयार असलेली पायाभूत सुविधा कणा ठरू शकतात, असे अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा-म्युच्युअल फंडकरता विशेष ५० हजार कोटी रुपयांची तरलता - आरबीआय