सॅन फ्रान्सिस्को - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट फ्लॅग केल्यावरून फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी ट्विटरवर टीका केली. समाजमाध्यम कंपन्या या सत्यासाठी लवाद होऊ शकत नाही, असे झुकेरबर्ग यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर ट्विटरने वस्तुस्थिती दर्शवित इशारा देणारे ऑनलाइन लेबल दाखविले होते. त्यानंतर संतापलेल्या ट्रम्प यांनी ट्विटरवर मोठी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत प्रश्व विचारला असता मार्क झुकेरबर्ग यांनी ट्रम्प यांचे फॅक्ट चेकिंग ट्विटरने करू नये, असे मत व्यक्त केले.
हेही वाचा-मास्क हीच तुमची नवी ओळख; गुजरातच्या फोटोग्राफने 'असा' शोधून काढला जुगाड
लोक ऑनलाइन काय म्हणत आहेत, त्या सर्वांबाबत समाजमाध्यमांनी सत्याचे लवाद होऊ नये. ट्विटरहून आमचे वेगळे धोरण आहे. खासगी कंपन्यांनी तसे करू नये. विशेषत:, समाजमाध्यमांनी तसे करू नये, असे मार्क्स झुकेरबर्ग यांनी सांगितले.
हेही वाचा-कोरोनावरील पंतजलीचे आयुर्वेदिक औषध चाचणीपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने अमेरिकेतील समाज माध्यमावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.